मुंबई : आठ तासांची झोप झाल्यानंतरही अनेकांना रिफ्रेश वाटत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणामी अनेकजण चहा, कॉफी यांची मदत घेतात. दिवसाची सुरूवात चहा, कॉफीसारख्या पेयाने करतात. रिकाम्यापोटी चहा, कॉफीसारखी कॅफिनयुक्त पेय प्यायल्यास त्रास होऊ शकतो. अनेकांना अ‍ॅसिडीटी त्रास होतो तर काहींना एनजेटिक वाटत असले तरीही तो फार काळ टिकत नाही.  


चहा, कॉफी ऐवजी तुमच्या दिवसाची सुरूवात या काही पेयांनी नक्की करा.  


केळ्याची स्मुदी 


केळ्यातील नैसर्गिक गोडवा दिवसाची परफेक्ट सुरूवात करायला मदत करते. केळ्यातील ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तुम्हांला एनर्जी देण्यास मदत करतात. दिवसाची सुरूवात स्मुदीने करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 


अ‍ॅपल स्मुदी  


केळ्याप्रमाणेच सफरचंदानेदेखील दिवसाची सुरूवात करणं फायदेशीर आहे. सफरचंदातील फ्रुक्टोज घटक नैसर्गिक स्वरूपातील साखर आहे.  


शहाळ्याचं पाणी  


शरीराल हायड्रेटेड ठेवणारा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणजे शहाळ्याचं पाणी. त्यामधील इलेक्ट्रोलाईट्स घटक शरीराला हायड्रेट ठेवतात. तसेच ततकाळ उर्जा देण्यास मदत करतात. 


प्रो बायोटिक्स 


प्रोबायोटिक्सच्या सेवनाने शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांना चालना मिळते.दिवसाची सुरूवात योगर्ट्स बेस्ड ड्रिंकने करा. त्यासोबत काही बेरीजचा आहारात समावेश करा. 


पाणी 


8 तास झोपल्यानंतर शरीर डिहायड्रेट होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दिवसाची सुरूवात करताना ग्लासभर पाणी प्या.