शरीरावर पडताय का असे निळे डाग तर सावधान!
शरीरातील एखादा भाग जर दुखत असेल आणि त्या ठिकाणी जर निळा डाग पडायला सरुवात झाली तर सावधान व्हा.
मुंबई : शरीरातील एखादा भाग जर दुखत असेल आणि त्या ठिकाणी जर निळा डाग पडायला सरुवात झाली तर सावधान व्हा. तुम्हाला वाटेल की तुम्हाला तेथे काही लागलं असेल त्यामुळे हा डाग पडला पण असं नसतं. एखाद्या गंभीर समस्येबाबत हा एक इशारा असू असतो.
शरीरावर लागल्याने आतील धमन्यांना देखील लागतं. ज्यामुळे हा निळा डाग पडतो. त्यामुळे हे रक्त कोशिकांमध्ये जातं. पण तुम्हाला लागलं नाही तर हा डाग दिसत असेल तर समस्या दुसरी देखील असू शकते.
पोषकतत्वांची कमतरता
शरीरामधील विटामिन आणि मिनरल काही जखम झाल्यास ते भरण्याचं काम करतात. पण पोषक तत्व कमी झाल्यास शरीरावर निळ्या रंगाचे डाग पडतात. शरीरात विटामिन K आणि C ची कमतरता झाल्यास असे डाग पडू लागतात.
म्हातारपण
वय वाढत जातं तसं व्यक्तीच्या शरीरातील धमन्यांना सूर्य किरणाचा सामना करणं कठीण होऊन जातं. ज्यामुळे शरीरावर निळे डाग पडण्यास सुरुवात होते.
एनीमिया
कोणताही जखम चांगली करण्यासाठी शरीरामध्ये आयरन आणि झिंकची आवश्यकता असते. शरीरामध्ये आयरनच्या कमतरतेमुळे शरीरावर निळे डाग पडू लागतात.