तिसऱ्या व्यक्तीमुळं वैवाहिक नात्यात आलाय दुरावा? लग्न टिकवण्यासाठी काय करावं वाचा
पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर हे नक्की वाचा
Tips for better married life : प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत संसार थाटण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. कित्येकांना ते स्वप्न पूर्ण करत जगण्याची संधी मिळते. पण, बऱ्याचजणांच्या या स्वप्नाला वास्तवाची झळ लागताच तडा जातो. प्रत्यक्षात एका व्यक्तीसोबत जेव्हा वैवाहिक आयुष्याची सुरुवात होते तेव्हा सुरुवातीचे दिवस वगळता कालांतरानं अनेकांना हे नवं आयुष्य कठीण वाटू लागतं. सध्याच्या पिढीमध्ये याचं प्रमाण तुलनेनं जास्त दिसून येतं.
अनेकजण अशा परिस्थिती त्रयस्त व्यक्तीशी (Third person in relationship) संवाद साधत नकळत बोलण्याच्या ओघात निघून जातात आणि इथंच वैवाहिक (Married Life) नात्यात दरी निर्माण होऊ लागते. नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यानं शंकाकुशंका, संशय आणि त्यामुळं होणारे आरोपप्रत्यारोप सुरु होता आणि भ्रमाचा फुगा फुटतो.
अधिक वाचा : ब्रेकअपनंतर कधीही करू या नका चुका, नाहीतर विसरून जा पॅचअप!
अती घाईमध्ये घटस्फोटापर्यंतचा (Divorce) निर्णय घेण्याऐवजी अशा वेळी जोडप्यांनी नात्याला आणि एकमेकांना वेळ देणं गरजेचं असतं. त्यासाठी खालील गोष्टी करणं सकारात्मक (Positive changes) बदल घडवू करतं.
- समोरील व्यक्तीची बाजू ऐकून घ्या. तिसऱ्या व्यक्तीला नात्यात महत्त्व देण्यापेक्षा जोडीदाराचं म्हणणं ऐका.
- आपली फसवणूक होत आहे याच भावनेनं म्हणणं ऐकण्यापेक्षा या भाव दूर ठेवा.
- नात्यामध्ये बाहेरच्यांना किती महत्त्वं द्यायचं हे ठरवा. तुमच्या खासगीतले वाद चव्हाट्यावर मांडू नका. बऱ्याचदा त्यामुळं जी व्यक्ती अडचणीत आहे त्यांच्या मनात शरमेचं वादळ उठतं.
- पती- पत्नी दोघांनीही एकत्र बसून नात्यात नेमकं काय बिनसलंय यावर चर्चा करा, एकमेकांची बाजू मांडा.
- दोघंही नव्यानं सुरुवात करण्याच्या तयारीत असाल, तर एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा नेमक्या कोणत्या आहेत ते स्पष्ट करा.
- शाब्दिक बाचाबाचीपर्यंत जाण्यापेक्षा सामंजस्यानं विषयावर तोडगा काढा. सर्वप्रथम मनातील संशय दूर ठेवत जर जोडीदार (ती किंवा तो) चूक स्वीकारत ती सुधारण्यासाठी एक संधी मागत असल्यास मनाची तयारी दाखवत माफ करा.
- अनेकदा तुमचा चांगुलपणाच तिसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वापुढे परचढ ठरतो. नात्यामध्ये मीच किती श्रेष्ठ दाखवण्यापेक्षा आपण जोडीनं या नात्याचा पाया किती भक्कम करु शकतो यावर भर द्या.
पती- पत्नीचं नातं एका काचेच्या भांड्याप्रमाणे असतं. त्यामुळं हे नातं अतिशय संवेदनशीलपणे हाताळणं गरजेचं आहे.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांना अनुसरून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. परिस्थिती गंभीर असल्यास आप्तेष्ठ आणि समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. )