Cough and cold medicine:  हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती ही कमी होते त्यामुळे सर्दी होणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, या काळात लहान मुलांना सगळ्यात जास्त त्रास होतो. त्याच जागेवर जर तुम्ही काळी मिरीचा वापर केलात तर तुम्हाला रुग्णालयात जाता येणार नाही. जर ते योग्य प्रमाणात वापरलं तर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.


सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवायचा असेल तर करा हे काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यात लहान मुलांना अशक्तपणा येतो आणि त्यामुळे त्यांना सर्दी खोकला होतो. काळी मिरी पावडर आणि मध या दोन्ही गोष्टी मिक्स करा, त्यानंतर मुलांना द्या यामुळे घसादुखी कमी होईल आणि सर्दी- खोकल्यापासूनही सुटका मिळेल. 


2. काळी मिरी दुधासोबतही घेतली तरी फायदा होतो. एक ग्लास दूध 1 चमचा गाईचं तूप आणि काळी मिरी पावडर मिक्स करा आणि लहान बाळाला द्या. 


3. दूध आणि मध व्यतिरिक्त, आपण ऑम्लेटसोबत काळी मिरी पावडर त्यावर स्प्रेडकरून खाऊ शकता. त्यामुळे मुलांना प्रोटीन मिळतील आणि सर्दी-खोकल्याची समस्या दूर होईल. 


हेही वाचा : Rekha नाही तर कोण आहे Amitabh Bachchan यांची पहिली सेलिब्रिटी क्रश? बिग बींनी घेतले 'या' अभिनेत्रीचे नाव


4. काळी मिरी आणि जाडे मीठ दोन्ही सर्दी आणि घसा खवखवणे कमी करण्यात मदत करतात. सततचा खोकला आणि सर्दी समस्या असणं ही साधारण गोष्ट आहे मात्र कधी हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. तुमची सर्दी आणि खोकला बराच काळ राहतो का, तर लगेच तपासनी करा.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)