Rekha नाही तर कोण आहे Amitabh Bachchan यांची पहिली सेलिब्रिटी क्रश? बिग बींनी घेतले 'या' अभिनेत्रीचे नाव

Amitabh Bachchan यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या 14 व्या पर्वात त्यांच्या सेलिब्रिटी क्रशच्या नावाचा खुलासा केला आहे.

Dec 02, 2022, 18:03 PM IST

Amitabh Bachchan First Celebrity Crush : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सध्या 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) सुत्रसंचालन करत आहेत. बऱ्याचवेळा बिग बी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या सेलिब्रिटी क्रश कोण आहे या विषयी खुलासा केला आहे. स्पर्धकानं विचारलेला प्रश्न ऐकूण अमिताभ यांना आधी धक्का बसला होता त्यानंतर बिग बींनी नाव सांगण टाळलं. मात्र, स्पर्धकानं पुन्हा एकदा विचारल्यानंतर अमिताभ यांनी अखेर खुलासा केला. हे नाव ना रेखा (Rekha) नाही जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे आहे असे अनेकांना वाटले असेल. मात्र, अमिताभ यांनी घेतलेलं नाव वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. 

1/5

Amitabh Bachchan celebrity crush waheeda rehman

अलीकडेच अमिताभ बच्चन यांना एका स्पर्धकानं खासगी प्रश्न विचारत आपल्या आवडत्या कलाकाराला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

2/5

Amitabh Bachchan celebrity crush waheeda rehman

या स्पर्धकानं अमिताभ यांना विचारले की त्यांचं पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण होत. सगळ्यात आधी अमिताभ यांनी या प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर त्यानी सेलिब्रिटी क्रशचं नाव घेत सांगितलं की मला त्यांचा अभिनय आणि त्या खूप आवडतात आणि त्यांचे नाव वहीदा रहमान (Waheeda Rehman) आहे. 

3/5

Amitabh Bachchan celebrity crush waheeda rehman

अमिताभ यांनी वहिदा रहमान यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ यांनी सांगितले की, त्यांना वहिदा रहमान खूप आवडते आणि आजही त्या सौंदर्य आणि कामाच्या बाबतीत त्यांना खूप आवडतात.

4/5

Amitabh Bachchan celebrity crush waheeda rehman

अमिताभ यांनी पुढे त्या कलाकाराचे नाव घेतले ज्यांचा ते खूप आदर करतात आणि ज्यांच्याकडून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. ते अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. 

5/5

Amitabh Bachchan celebrity crush waheeda rehman

वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चन एकमेकांचा हात धरून उभे आहेत. अमिताभ यांनी वहिदा रहमान यांचे नाव घेतले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. बिग बी रेखा किंवा जया बच्चन यांचे नाव घेतील असे अनेकांना वाटत होते.