मुलांनी मोठ्यांसाठी असलेला ब्रश का वापरू नये? डॉक्टर काय म्हणतात पाहा
Childrens Oral Health : लहाण मुलांच्या ओरल हेल्थ म्हणजे दातांची आणि तोंडाची काळजी कशी घ्यावी यावर कोणी जास्त बोलत नाहीत. कारण अनेकांना वाटतं की त्यांचे दात एकदा पडले की नवीन येतील तर काही होत नाही. पण मुलांच्या ओरल हेल्थची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Childrens Oral Health : भारतात, ओरल हेल्थ म्हणजेच आपल्या तोंडाच्या स्वच्छतेकजडे लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे. Oral Health ला कोणी गांभीर्यानं घेत नाही. आपल्या आपल्या ओरल हेल्थवर लक्ष ठेवणं आणि त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्या मुलांना सांगने देखील महत्त्वाचे आहे. याविषयी मुलांना लहाणपणापासूनच माहिती द्यायला हवी. बऱ्याचवेळा आपण अनेकांच्या घरी पाहतो की जसे मोठ्यांचे ब्रश असतात तेच ब्रश त्या लहाण मुलांना देण्यात येतात. पण ही चांगली गोष्ट नाही. कारण सगळेच टुथ ब्रश हे सगळ्यांसाठीच बनलेले नसतात. प्रत्येक टुथ ब्रश हा वेगळं काम करतो. मोठ्यांचे दात, त्यांच्या हिरड्या, जीभ आणि लहाण मुलांचे दात, हिरड्या आणि जीभ यांच्यात खूप मोठा फरक असतो. त्यामुळे मुलांना नेहमीच त्यांच्यासाठी असलेलेच ब्रश द्या मोठ्यांचे ब्रश देऊ नका.
लहाण मुलांनी त्यांच्यासाठी असलेले टूथब्रशच का वापरावे? काय आहे त्या मागचे कारण, काय हे मुंबईचे डॉक्टर राजीव चितगुप्पी यांनी याविषयी काय सांगितलं ते जाणून घेऊया...
1. प्रौढांच्या तुलनेत मुलांचं तोंड हे लहान असते. पालकांनी मुलांच्या तोंडात आरामात बसेल असा टूथब्रश निवडावा जेणेकरून टूथब्रशचं डोकं त्यांच्या तोंडाच्या सर्व भागात नीट पोहोचू शकेल.
2. ब्रश ब्रिस्टल्सच्या निवडीमुळे हिरड्या आणि तोंडाच्या त्वचेच्या आरोग्यामध्ये लक्षणीय फरक पडतो. कडक ब्रिस्टल्समुळे मुलाच्या तोंडाच्या आतील थरांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, मुलांच्या नाजूक हिरड्यांवर हलका, मऊ, गोलाकार, पॉलिश ब्रिस्टल्स असलेले टूथब्रश वापरायला हवेत.
3. हँडलचा आकार आणि डिझाईन देखील असे असले पाहिजे की मुलांना तो टूथब्रश सहजपणे धरता आला पाहिजे. मुलांच्या लहान हातांसाठी डिझाइन केलेला टूथब्रश निवडा. मोठ्या हँडलसह असणारे टूथब्रश मुलांना चांगल्या प्रकारे दात घासण्यास मदत करतो.
4. लाइट किंवा हँडलवर कोरलेली त्यांची आवडती कार्टून पात्रे असलेला टूथब्रश निवडा. लहान मुलांसाठी दात घासणे एक मजेदार अनुभव बनवण्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे. कारण त्यांच्या टूथब्रशवर असं काही असेल तर त्यांना कंटाळ येणार नाही आणि ते आनंदानं ब्रश करतील. दरम्यान, मुलं कमीत कमी दोन मिनिटं तरी ब्रश करतील याची काळजी घ्या. ब्रश करत असताना त्यांना दात घासण्याचे फायदे सांगा जेणेकरून ते कंटाळ करणार नाहीत.
हेही वाचा : Age Weight Chart : उंची-वयानुसार तुम्ही लठ्ठ आहात का? उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा चार्ट
टूथब्रश कधी बदलावा?
टूथब्रश कधी बदलायला हवा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदला. त्याआधी जर तुमच्या ब्रशचे ब्रिस्टल फुगायला लागले असं वाटत असेल तर लगेच ब्रश बदला. कारण ब्रशते ब्रिस्टल चांगले असणे महत्त्वाचे आहे. जर ब्रिस्टल चांगले नसतील तर मुलांच्या हिरड्यांना इजा पोहोचू शकते.त्याशिवाय ब्रश करण्याचा ते कंटाळ देखील करू शकतात.