Condom Breaks : सुरक्षित सेक्ससाठी कपल्स कंडोमचा ( Condom ) वापर करतात. यामुळे अनावश्यक गर्भधारणा तर टळतेच, सोबत शारीरिक संबंधांमार्फत पसरणाऱ्या इन्फेक्शनचा धोकाही टळतो. दरम्यान इंटीमेट होताना अनेक वेळा कंडोम फाटतो ( Condom Breaks ) किंवा त्याला एखादा कट जाण्याची शक्यता असते. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे कारण कंडोम ( Condom ) हे अनावश्यक गर्भधारणा टाळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी परिस्थिती उद्धभवू नये यासाठी कंडोम फाटण्याची कारणं जाणून घेतली पाहिजे. जेणेकरून शारीरिक संबंध ठेवताना असं होणार नाही. 


ल्यूबचा वापर


शारीरिक संबंध ठेवताना जर समोरच्या व्यक्तीला कोरडेपणाची समस्या असेल तर त्यावेळी ल्युबचा वापर नक्की करावा. कोरडेपणामुळे कंडोम वापरताना फाटला जाण्याची दाट शक्यता असते. किंवा त्यावेळी कंडोमला कट जाण्याचीही भीती असते. अशावेळी ल्यूबचा वापर करताना लाजू नका. 


ऑइल बेस्ड ल्यूब


अनेकजण ल्यूब म्हणून इतर गोष्टींचा वापर देखील करतात. यामध्ये व्हॅसलीन, खोबरेल तेल किंवा लोशनचा वापर केला जातो. मात्र यांचा वापर करणं धोकादायक आहे. या गोष्टी कंडोममध्ये खूप बारीकपणे प्रवेश करण्याची दाट शक्यता असते. 


कुठे ठेवताय कंडोम


ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्या ठिकाणी कंडोम ठेवावं. ते एका गडद जागी आणि थंड ठिकाणी ठेवणं योग्य आहे. मात्र जास्त थंडीच्या ठिकाणीही कंडोम ठेवू नये. यामुळे देखील कंडोम फाटण्याची शक्यता असते. 


कंडोम योग्य पद्धतीने न वापरणं


कंडोम फाटण्यामागे अजून एक कारण असून शकतं ते म्हणजे, त्याचा योग्य पद्धतीने वापर न करणं. जर तुम्ही पहिल्यांदा कंडोम वापरणार असाल तर त्याचा वापर कसा करायचा याची माहिती घ्या. जर ते चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं तर लैंगिक संबंधादरम्यानच ते फाटण्याची शक्यता असते. 


स्वस्तातील कंडोम


स्वस्त कंडोम घेण्याच्या जाळ्यात अडकू नका. शारीरिक संबंध ठेवताना अशा कंपनीचे कंडोम घ्या, जे अधिक सुरक्षित आणि दर्जेदार असेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)