मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे. यावेळी ओमायक्रॉन व्हेरिएंटची अनेक प्रकरणं समोर येतायत. दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देखील ओमायक्रॉनबाबत इशारा दिला आहे. अशात अमेरिकेतंही कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेत बूस्टर डोस देण्यात सुरुवात झाल्यानंतरही रूग्णसंख्या वाढताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाचे 5 लाख 80 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तिथे एकाच दिवसात आढळलेली नव्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.


कोरोनाची बाधा झालेल्या लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ब्रिटन, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढला आहे.


ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णसंख्येतही वाढ


दरम्यान भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत 1300 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवली गेली आहेत. केरळमध्येही ओमायक्रॉनचे 44 नवीन रुग्ण आढळले आहेत. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात ओमायक्रॉनची 450 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. Omicron प्रकरणं नोंदवलेल्या 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी महाराष्ट्रात 450 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, त्यापैकी 125 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.