मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागलेत. यावेळी मुंबईमध्येही कोरोनाच्या रूग्णांचा आलेख वाढताना दिसतेय. मुंबईत दिवसभरात 500 च्या वरती कोरोना रुग्ण सापडल्याने चिंतेत वाढ झालीये. मंगळवारी दिवसभरात 506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत नव्या 506 कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील नागरिकांची चिंता वाढली आहे. यावेळी नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या 500 च्या खाली होती. मात्र, मंगळवारी नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसतंय.


मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकंही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 218 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबईमध्ये सध्या 2526 एक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्क्यांवर आहे.


तर दुसरीकडे कोरोनाचा जोर ओसरल्याने राज्यात सर्व निर्बंध शिथिल करण्यात आलेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झालीये.


दिवसभरात राज्यामध्ये एकूण 700 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब अशी की या 700 पैकी 506 रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत.