Corona Update : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय असं वाटत असतानाच देशात आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 16 हजार 561 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 535 इतकी झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे 24 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 5.44% वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाची दररोज 15 हजाराहून अधिक रुग्णसंख्या आढळत असल्याने केंद्राच्या आरोग्य विभागने स्वातंत्र्य दिनानिमित्त काही मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे. 


कोरोनामुळे आतापर्यंत इतके मृत्यू
देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 26 हजार 928 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात एकट्या केरळमध्ये 10 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दिल्लीत 6 जणांचा मृत्यू झाला.


कोणत्या राज्यात किती रुग्ण?
गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 1877 रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत 2,779, पश्चिम बंगालमध्ये 598, उत्तर प्रदेशात 1018, केरळात 1212, कर्नाटकात 1691, ओडिसा 530, तामिळनाडू 892, राजस्थान 658, गुजरात 552 रुग्ण आढळले आहेत. 


या राज्यात जास्त सक्रिय रुग्ण
पंजाब - 13253
महाराष्ट्र - 11889
कनार्टक  - 10351
केरल - 9865
दिल्ली  - 8205
तमिलनाडु   - 8586
पश्चिम बंगाल - 6646


राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. दिल्लीमध्ये वाढता संसर्ग पाहता पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेनं आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे.