मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने अखेर 3 नोव्हेंबर रोजी कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना लसीला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आहे. ही आठवी लस आहे ज्या लसीला WHOने आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. लसीला मान्यता देताना डब्ल्यूएचओने असंही म्हटलं आहे की, ही लस अगदी सहजपणे साठवली जाऊ शकते, त्यामुळे गरीब देश देखील या लसीचा सहज वापर करू शकतात.


WHOने केल्या अनेक चाचण्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीला मंजूरी देण्यापूर्वी, WHOने 4 पॅरामीटर्सवर त्याची चाचणी केली. यामध्ये गुणवत्ता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जोखीम व्यवस्थापन यांसारख्या मुद्यांचा समावेश होता. जोखीम व्यवस्थापन म्हणजे कोणताही दुष्परिणाम झाल्यास, लस बनवणारी कंपनी भारत बायोटेक तिचं व्यवस्थापन कसं करेल. 


3 नोव्हेंबरपूर्वी, WHOने या लसीला मान्यता देण्याच्या मुद्द्यावर अनेक बैठका घेतल्या. लसीला मान्यता देण्यास विलंब झाला मात्र डब्ल्यूएचओने नेहमीच या या उत्तर दिलं. भारत बायोटेकने अद्याप सर्व कागदपत्रे आमच्याकडे सादर केलेली नाहीत, त्यामुळे विलंब होत असल्याचं WHOचं म्हणणं होतं.


या अटींवर लसीला मान्यता


WHOला लसीच्या मंजुरीसाठी 6 आठवडे लागतात, परंतु भारत बायोटेकने एप्रिल 2021 मध्ये लस मंजूर करण्यासाठी अर्ज केला आणि त्याला मंजुरी मिळण्यासाठी सुमारे 7 महिने लागले. सध्या, WHOने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 4 आठवड्यांच्या अंतराने कोवॅक्सीनचा दुसरा डोस घेण्यास मान्यता दिली आहे. 


भारतात, आता 2-18 वयोगटासाठी लस मंजूर करण्यात आली आहे. WHOने अद्याप गर्भवती महिलांना कोवॅक्सीन वापरण्यास मान्यता दिलेली नाही. त्यासाठी अधिक संशोधन करून त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भारतातील गर्भवती महिलांना ही लस देण्याची परवानगी आहे.


जून 2021 पासून सुरु होती तयारी


कोवॅक्सीन लस ICMR आणि भारत बायोटेक फार्मा कंपनीने संयुक्तपणे तयार केली आहे. या मंजुरीनंतर, भारत बायोटेकने आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केलंय  की, आम्ही जून 2021 मध्ये लसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी डेटा तयार केला होता आणि जुलै 2021 मध्ये WHOने आमच्या अर्जावर आपत्कालीन वापर मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली. 5 ऑक्टोबर रोजी, WHOच्या सल्लागार टीम स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ऑन इम्युनायझेशन (SAGE) ने ही लस मंजूर केली आणि 3 नोव्हेंबर रोजी WHOने त्याला मान्यता दिली आहे.