मुंबई : सध्या महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढतायत. त्याचप्रमाणे मुंबईत सर्दी-खोकल्याच्या रूग्णांचं प्रमाणंही वाढतंय. कोरोनाच्या या काळात सर्दी-खोकला होणं ही चिंतेची बाब ठरु शकते. कारण, सर्दी आणि खोकला हे कोरोनाचं प्राथमिक लक्षणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. या काळात काही गोष्टी खाणे टाळावे. तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याची माहिती घेऊया.


मसालेदार पदार्थ


सर्दी झाल्यानंतर अनेकादा तिखट खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणं टाळावं. मसालेदार पदार्थ स्वादिष्ट असतात. मात्र याच मसालेदार पदार्थांमध्ये व्हिनेगर आणि मीठ यांचं प्रमाण जास्त असतं. यामुळे तुमचा घसा खवखवतो आणि घशातील सूजही वाढू शकते.


स्ट्रॉबेरी


स्ट्रॉबेरी हे एक सुपरफूड मानलं जातं. स्ट्रॉबेरीमध्ये स्टेमन सोडण्याची क्षमता असते. याच्या वाढीमुळे तुमच्या नाकात आणि सायनसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. स्ट्रॉबेरीमुळे सर्दी-खोकला होण्याचं प्रमाणही वाढते. त्यामुळे याचं सेवन करणं टाळावं. 


प्रक्रिया केलेले पदार्थ


सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने तब्येत बिघडण्याची शकता अधिक असते. बऱ्याचदा रेडी टू इट अन्न खाल्ल्याने शरीराला त्रास होतो. या पदार्थांवर प्रक्रिया केली असल्याने ते फ्रेश नसतात. तसंच, काही पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण अधिक असतं.