COVID-19 महामारी हिवाळ्यानंतर...; कोरोनाबाबत तज्ज्ञांनी दिली मोठी चेतावणी
चीनमध्ये कोरोनाने रूद्र रूप धारण केलं आहे. या ठिकाणी रूग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, औषधांची कमतरता जाणवतेय शिवाय चहूबाजूला कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच तज्ज्ञांनी अजून एक मोठा इशारा दिला आहे.
COVID-19 omicron BF.7 varient in china: चीनमध्ये कोरोनाने रूद्र रूप धारण केलं आहे. या ठिकाणी रूग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, औषधांची कमतरता जाणवतेय शिवाय चहूबाजूला कोरोनाने थैमान घातलं आहे. चीननंतर आता दुसऱ्या देशांना देखील कोरोनाची चिंता सतावू लागलीये. आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी अनेक देशांनी प्रतिबंधनात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतात देखील केंद्र सरकार अलर्टवर आहे.
कोरोनाच्या व्हेरिएटं BF.7 ने जगभरात हाहाकार माजवणाला असून वायरोलॉजीस्ट डॉ. क्रिश्चियन ड्रोस्टन (Christian Drosten) यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये कोरोनाबाबत मोठं भाकीत केलं आहे. डॉ. ड्रोस्टन यांच्या सांगण्यानुसार, कोरोनाची महामारी आता लवकरच संपुष्टात येणार आहे.
हिवाळ्यानंतर संपणार कोरोनाची महामारी
जर्मन वायरोलॉजिस्ट क्रिश्चियन ड्रोस्टन (Christian Drosten) बर्लिनच्या चेरिटे यूनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये वायरोलॉजीचे प्रमुख आहेत. ते म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग आता स्थानिक पातळीवर पोहोचलाय. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की, कोरोना अत्यंत मर्यादित भागांमध्ये तसंच कमी धोकादायक स्वरूपात पाहायला मिळू शकतो."
डॉ. ड्रोस्टन यांच्या म्हणण्याप्रमाणे, व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पद्धती जसजशा विकसित होतील तसा हा व्हायर, प्राणघातक राहत नाही. हा व्हायरस सुरुवातीच्या काळात होता तितका आता हानिकारक राहिला नाही.
वायरोलॉजिस्ट क्रिश्चियन यांनी पुढे सांगितलं की, या हिवाळ्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेची अपेक्षा करतोय. माझ्या अंदाजाप्रमाणे, ही महामारी संपुष्टात आली आहे. हिवाळा संपल्यानंतर लोकांची इम्युनिटी इतकी मजबूत होईल की उन्हाळ्यात व्हायरसच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी आहे.
चीनमध्ये 60 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात!
चीनमधली हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरुन गेली आहेत. तर अमेरिका आणि युरोपमध्ये तापाच्या आणि अंगदुखीच्या गोळ्यांची मोठी कमतरता जाणवतेय. त्यामुळे औषध विक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. पुढच्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत.चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
चीनप्रमाणेच हा व्हेरियंट इतर देशांमध्येही पसरला तर काय? नुसत्या कल्पनेनं जगभरातील संशोधकांचा थरकाप उडालाय. या नव्या व्हेरियंटमध्ये सातत्यानं बदल होतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची चिंता संशोधकांना सतावतीय