डेंग्यूचा धोका वाढतोय!`या` टीप्स वापरून घरातले डास पळवा
`हे` घरगूती उपाय करून पाहा, घरात एकही डास उरणार नाही
मुंबई : पावसाळ्यात डेंग्यूचा (Dengue Mosquito) धोका वाढतोय. डेंग्यू ताप हा डास चावल्याने होतो.हा ताप माणसाला पूर्णपणे अशक्त बनवतो आणि कधी कधी प्राणघातकही ठरतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही डेंग्यूच्या धोक्यापासून अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहू शकाल.
डास चावणार नाहीत
डेंग्यू (Dengue Mosquito) टाळायचा असेल तर आधी डेंग्यूच्या डासांपासून दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी घरातून बाहेर पडताना दोन्ही हात पाय झाकून घ्या. जर तुम्हाला स्लीव्हलेस कपडे घालून जायचे असेल, तर तुम्ही डास चावण्यापासून वाचण्यासाठी तुमच्या हातावर औषध लावावे. याशिवाय झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
खिडक्या-दरवाजे बंद ठेवा
पावसाळ्यात डेंग्यूचा (Dengue) प्रसार होण्याची शक्यता सर्वाधिक असते.म्हणूनच या ऋतूत तुम्ही घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवणे गरजेचे आहे. असे केल्याने तुम्ही डासांना घरात जाण्यापासून रोखू शकाल.
घर स्वच्छ ठेवा
घाणीत डासांची (Dengue) सर्वाधिक पैदास होते. पाऊस पडल्यानंतर, ज्या ठिकाणी पाणी साचते, अशाच ठिकाणी डास अंडी घालतात. घरातील साठलेले पाणी स्वच्छ करत रहा. याशिवाय कुठेही कचरा साचू देऊ नका, ते डासांचेही घर आहे.
दरम्यान वरील सर्व पर्याय वापरून तुम्ही घरातून डासाचा नायनाट करू शकता. तसेच डेग्यू (Dengue) सारख्या आजारापासून दूर राहू शकतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)