Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Disease X Pandemic News in Marathi: सर्दी किंवा खोकल्यावर शिंका येणे हे अगदी सामान्य आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात. जर वेळीच काळजी घेतली नाही तर कॅन्सर, कोरोनापेक्षाही भयंकर आजाराला सामोरे जावं लागू शकतं. कारण तज्ज्ञांनी Disease X (डिजीजी एक्स) एका नव्या आजाराची भीती व्यक्त केली आहे. हा आजार कोरोनापेक्षा सातपट जास्त धोकादायक असल्याची भीतीह तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे जवळपास 5 कोटी लोकांची जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
काय आहे डिजीज एक्स?
डिजीज एक्स हा एक काल्पनिक व्हायरस असून जो पुढे गंभीर महामारीचं कारण बनू शकतो. हा आजार एक अज्ञात रोगजनक आहे. ज्याचा अर्थ शास्त्रज्ञांना अद्याप माहीत नाही की ते नेमकं काय आहे किंवा तो कसा पसरतो. हा आजार प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो आणि वेगाने पसरू शकतो, तज्ञांचा असा विश्वास नाही. जीज एक्ससाठी तयारी अत्यंक महत्त्वाची आहे कारण तो केव्हा किंवा कुठून येईल हे आपल्याला माहित नाही. परंतु जर आपण तयार झालो तर आपण त्वरीत त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो. यावर उपाययोजना करु शकतो आणि दुसऱ्या जागतिक महामारीला रोखण्यास मदत करु शकतो.
तज्ज्ञांनी दिला इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला असून हंगामी फ्लू ही केवळ हिवाळ्यात उद्भवणारी समस्या नाही. दरवर्षी या फ्लूने जगभरात अंदाजे 1 कोटीहून अधिक लोक संक्रमित होत असतात. त्यापैकी लाखो लोक गंभीर आजारी असल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती डब्ल्यूएचओ दिली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की, डिसीज X हा माकड, कुत्रे यांसारख्या कोणत्याही प्राण्यापासून पसरू शकतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, डिसीज X हा धोकादायक आजार असू शकतो. तसेच, इबोला, एचआयव्ही एड्स, कोविड सारख्या रोगांचा प्रसार करून मानवांना संक्रमित करू शकतो.
फार्मास्युटिकल कंपनीचे सल्लागार जॉन फुल्टन यांनी यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की, 'कोविडपेक्षा हे 100 पटीने धोकादायक आहे. डब्ल्यूएचओच्या नोंदीनुसार, डेटा हायलाइट करतो की 2003 पासून H5N1 विषाणूने संक्रमित झालेल्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 52 जणांचा मृत्यू झाला. परिणामी मृत्यू दर 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हा दर सध्याच्या कोविड-19 मृत्यू दरापेक्षा खूप जास्त आहे. कोविड-19 मुळे मृतांची संख्या 0.1 टक्के आहे.