बकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो? बघा डॉक्टरांचं काय म्हणणं आहे!
जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते.
मुंबई : संपूर्ण देश कोरोनाच्या तडाख्यातून सावरलाही नव्हता, तोपर्यंत डेंग्यूने उत्तर भारतात हाहाकार माजवला होता. गेल्या वर्षभरात जितकी रूग्णसंख्या समोर आली नव्हती तिकती रुग्णसंख्या अवघ्या गेल्या महिनाभरात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार दिल्लीसह उत्तर भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत बकरीच्या दुधाची मागणी खूप वाढलीये. बाजारात शेळीचे दूध 1500 रुपये लिटरपर्यंत विकलं जातंय.
यापूर्वी पण वाढली होती दूधाची डिमांड
हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. जेव्हा डेंग्यूचे रुग्ण वाढतात तेव्हा बकरीच्या दुधाची मागणी लक्षणीय वाढते. पण बकरीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो का? याचं संपूर्ण सत्य काय आहे? शेवटी, डॉक्टर डेंग्यूमध्ये बकरीचं दूध पिण्याचा सल्ला का देतात? या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बकरीच्या दुधात हे पोषक घटक असतात
बकरीच्या दुधात व्हिटॅमिन B6, B12, C आणि D कमी असते. त्यात फॉलिक अॅसिड नावाचं अत्यावश्यक जीवनसत्व असतं. पण फोलेट बाइंडिंग कंपाऊंड जास्त प्रमाणात असतं. बकरीच्या दुधात असलेले प्रथिनं हे गाय, म्हशीच्या दुधाच्या मानाने पचायला फारसं अवघड नसतं. यासोबतच हे रक्त पेशींची संख्या वाढवण्याचं काम करतं.
काही अहवालांमध्ये असं समोर आलं आहे की, बकरीच्या दुधात सेलेनियम नावाची एक महत्त्वाची गोष्ट असते. डेंग्यूचा मुख्य धोका म्हणजे सेलेनियम आणि प्लेटलेटच्या संख्येचा असतो. यासोबत बकरीच्या दुधापासून शरीराला सेलेनियम मिळतं आणि त्यामुळे डेंग्यूशी लढण्यास मदत होते. हे गाईच्या दुधातही आढळतं, परंतु बकरीच्या दुधात याचं प्रमाण अधिक असतं.
डेंग्यूच्या रुग्णाला बकरीचं दूध किंवा पपईचा रस देणं योग्य नाही, असं मत अतिरिक्त संचालक (आरोग्य) ए.के. सिंह यांनी म्हटलंय. यावर अद्याप कोणताही अभ्यास झालेला नाही. अशा परिस्थितीत रुग्णाला बकरीचं दूध देणं योग्य नाही.