मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणासोबत किंवा जेवणानंतर एक वाटी दह्याचं सेवन केलं जातं. दह्यामध्ये प्रोबायोटिक तत्त्व असल्यामुळे पचन कार्यासाठी देखील उत्तम असतं. दह्यामध्ये व्हिटॅमीन बी-2, व्हिटॅमीन बी-12 , पोटॅशियम, कॅल्शियम तसंच मॅग्नेशियमचं प्रमाणंही भरपूर आहे. शरीराला थंडावा मिळत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत दह्याचं सेवन केलं जातं. मात्र दह्याचं सेवन करताना एक इतर काही खाद्यपदार्थांचं सेवन करणं नुकसानदायक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घेऊया दह्यासोबत कोणते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे


तेलकट पदार्थ खाऊ नयेत


दह्यासोबत अधिक तेलकट पदार्थांचं सेवन करू नये. दह्यासोबत तेलकट पदार्थ खाल्ल्यास पचन कार्य हळूवार होतं. यामुळे अपचनाची समस्या बळावण्याची शक्यता असते. 


मासा खाऊ नये


आयुर्वेदाप्रमाणे एकावेळी प्रोटीनचे विविध पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. मासा आणि दही या दोघांमध्येही प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. जर या दोन्ही पदार्थांचं एकत्र सेवन केल्याने अपचन तसंच त्वचेसंदर्भातील समस्या उद्भवण्याची शक्यता असते.


दूध आणि दह्याचं सेवनंही एकत्र करू नये


दूध आणि दह्याचं एकत्रित सेवन केल्यामुळे अॅसिडीटी, अतिसार तसंच पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. प्रोटीनच्या दोन स्त्रोतांमध्ये फॅटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे या पदार्थांना एकावेळेस खाण्याटा सल्ला दिला जात नाही.


दह्यासोबत आंबा खाऊ नये


दही आणि आंबा एकत्रित करून विविध पद्धतीचे ड्रिंक्स तयार केले जातात. शिवाय हे ड्रिंक अनेकांच्या पसंतीचं देखील आहे. मात्र आंबा आणि दह्याचं एकत्रित रित्या सेवन केल्यास त्वचेसंदर्भातील समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते. 


आंबट फळांसोबत दही खाऊ नये


आंबट फळं आणि दही एकत्रित खाल्ल्याने पचनकार्य सुरळीत होण्यास त्रास होतो. यामुळे पचन क्रिया हळूवार होते. तसंच बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रासही होऊ शकतो.