Drinking Ro Water Side Effects For Health: शुद्ध पाणी मिळवण्यासाठी पूर्वी पाणी तापवून मग गाळून ते प्यायले जायचे. मात्र, जसा काळ बदलला तसा नवे तंत्रज्ञानही आले. आता पाणी शुद्ध करण्यासाठी घराघरात आरओचे वॉटर फिल्टर दिसून येतात. यामुळं पाणी शुद्ध होऊन व फिल्टर होऊन येते. त्यामुळं आता प्रत्येकाच्या घराघरात हे वॉटर फिल्टर दिसत आहेत. पण तुम्हाला हे माहितीये का? अति शुद्ध पाणी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला घरात RO वॉटर फिल्टर लावायचे असेल तर याची खात्री करुन घ्या की तुमच्या पाण्यात एकूण विद्रान्य घन पदार्थ (Soluble solids (TDS)) 200-250 मिलीग्राम प्रति लिटर असावेत. जेणेकरुन कॅल्शियम आणि मॅग्निशयमसह सर्व आवश्यक खनिजे शरीराला मिळतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजेच आरओसंबंधित एका वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यात प्रमुख वैज्ञानिक अतुल वी मालधुरे यांनी म्हटलं आहे की, पाणी शुद्ध करत असताना आरओ पाण्यातील अनेक फायदेशीर खनिजेदेखील नष्ट करते. जागतिक आरोग्य संघटनेनेही आरओ फिल्टरच्या वापराबाबत इशारा दिला होता. 2019मध्ये WHOने म्हटलं होतं की, ROची मशीन पाणी स्वच्छ करण्यास खूप प्रभावी आहे. मात्र, पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्निशियमदेखील हटवते. हे तत्वे एनर्जी निर्माण करणारे आहेत. त्यामुळं हे सर्व नैसर्गिक तत्वांशिवाय आल्मयुक्त पाण्याचा दीर्घकाळ वापर करणे आरोग्यासाठी घातक आहे. 


पाणी उकळून प्यायला हवे


गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे प्रमुख डॉ. अनिल अरोरा यांनी म्हटलं आहे की, ROच्या पाण्याऐवजी नागरिकांनी नायट्रेटसारख्या अशुद्ध तत्वे गाळल्यानंतर पाणी उकळून प्यायला हवे. त्यांनी म्हटलं की, पाणी उकळल्यानंतर फक्त बॅक्टेरिया, व्हायरस आण फंगस मरुन जातील. त्यांनी हेदेखील सांगितले की, ROचं पाणी कित्येक वर्ष प्यायल्यामुळं काही जणांना मांसपेशियांमध्ये वेदना, थकवा, पेटके येणे, स्मरणशक्ती कमी होणे, इत्यादी समस्या निर्माण होत आहेत. तर, हे सगळं खनिजांच्या कमतरतेमुळं होतं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


WHOने काय शिफारस केली? 


WHOने प्रति लीटर पाण्यात 30 मिलीग्रॅम कॅल्शियम, 30 मिलीग्रॅम बायकार्बोनेट आणि 20 मिलीग्रॅम मॅग्निशियम असावे, अशी शिफारस केली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वॉटर फिल्टर रोगराई पसरवणाऱ्या बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस आणि घाण हे गाळत. मात्र त्याचबरोबर शरीराला आवश्यक असलेली खनिजे या 'शुद्ध' पाण्यात नसतात. त्यामुळं वॉटर फिल्टरच्या ऐवजी कॉटनच्या कपड्यातून पाणी गाळून घेतल्यानंतर 20 मिनिटांपर्यंत पाणी उकळून घ्या, हा चांगला पर्याय आहे.