Eating While Sitting On Floor: भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून जेवायला बसण्याची पद्धत योग्य असल्याचं सांगितलं. पण गेल्या काही दशकांमध्ये डायनिंग टेबलचा ट्रेंड वाढला आहे. पाठ आणि हाडांच्या दुखापतीमुळे अनेकजण खुर्चीवर बसून जेवणं पसंत करतात. मात्र घरातील वडिलधारी माणसं अशा पद्धतीने जेवण करण्यास मनाई करतात. दुसरीकडे लग्न सभारंभातही लोकं उभं राहून जेवतात. नीट बसून जेवण केलं नाही तर पचन व्यवस्था बिघडते. आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो, अशा स्थितीत बहुतेक आरोग्य तज्ज्ञ जमिनीवर मांडी घालून जेवण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊयात जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याचे फायदे कोणते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. खाण्यावर लक्ष केंद्रित असतं- अन्न चावून खाणे महत्वाचे आहे.  जर तुम्ही जमिनीवर बसून जेवत असाल तर तुमचे संपूर्ण लक्ष अन्नावर राहतं. मांडी घालून बसल्यानंतर अन्न नीट चघळलं जातं आणि बद्धकोष्ठतेची तक्रार येत नाही. 


2. जास्तीचं जेवण टळतं- जमिनीवर बसून जेवण केल्यानं खाण्यावर लक्ष केंद्रित होतं. त्यामुळे जास्तीचं जेवण जात नाही. अतिरिक्त जेवण केल्यास पोट फुगणे आणि जडपणाच्या समस्या जाणवतात. पुरेसं जेवण झाल्यास वजन वाढत नाही. लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो.


Hair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा


3. हाडांच्या वेदना कमी होतात- जमिनीवर मांडी घालून जेवण केल्याने  पाठीचा कणा आणि मान या दोन्हींना उत्तम स्ट्रेच मिळतो. ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळते. भविष्यात पाठदुखी किंवा हाडे दुखण्याची समस्या उद्भवत नाही.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. तीचा अवलंब करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)