Hair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा

केस मजबूत राहण्यासाठी डँड्रफ (Dandruff) घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा महागडी उत्पादनं वापरूनही डँड्रफ जैसे थेच असतो. त्यामुळे नेमकं करावं काय असा प्रश्न पडतो. अशात शॅम्पूसोबत काही गोष्टी वापरल्यास डँड्रफपासून सुटका (Hair Solution) होऊ शकते.

Updated: Oct 7, 2022, 01:16 PM IST
Hair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा title=

Shampoo For Dandruff: केस गळतीमुळे अनेकदा न्युनगंड येतो. अनेकदा आत्मविश्वास देखील ढासळतो. केस गळतीचं (Hairfall) सर्वात प्रमुख कारण म्हणजे केसांमध्ये होणारा डँड्रफ. यामुळे केस कमकुवत आणि पातळ होतात. त्याचबरोबर केस गळतीचं प्रमाण देखील वाढतं. त्यामुळे केस मजबूत राहण्यासाठी डँड्रफ (Dandruff) घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा महागडी उत्पादनं वापरूनही डँड्रफ जैसे थेच असतो. त्यामुळे नेमकं करावं काय असा प्रश्न पडतो. अशात शॅम्पूसोबत काही गोष्टी वापरल्यास डँड्रफपासून सुटका (Hair Solution) होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात...

एलोवेरा जेल (Aloe vera gel)- एलोवेरा जेल तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे केस धुण्यापूर्वी एलोवेरा जेल शॅम्पूमध्ये मिसळा आणि त्यानंतर केस धुवा. कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात डँड्रफ दूर करण्यास मदत करतात. 

आवळा रस (Amla Juice)- आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

लिंबाचा रस (Lemon Juice)- आवळ्याप्रमाणेच लिंबाच्या रसामध्येही कोंडाविरोधी अनेक गुणधर्म असतात. केसांमधील कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

Health Tips: Diabetes रुग्णांसाठी 'इंग्लिश चिंच' गुणकारी, जाणून घ्या कशी ठरते प्रभावी

 

मध (Honey)- मधामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे स्कॅल्पवरची खाज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे केसांना शॅम्पू करणार असाल तर त्यात मध टाकून टाळूवर लावा आणि 15 मिनिटे मसाज करा, असे केल्याने तुमची कोंड्याची समस्या दूर होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. तीचा अवलंब करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)