मुंबई : अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना अजून एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रूग्णालयात कोविडमधून बरं झाल्यानंतर विविध गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. एम. वाली यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोविडनंतरच्या कॉम्‍प्‍लिकेशन्स दिसून येणारे दररोज किमान 5-6 रुग्ण मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनातून मुक्त झालेल्यानंतर दिसून येतायत या समस्या कोविडमधून बरे झाल्यानंतर, आता रुग्णांना स्नायूंच्या समस्या, मळमळ, थकवा, जास्त केस गळणं या समस्या दिसून येत आहेत. डॉ वाली यांनी या कोविड नंतरच्या कॉम्‍प्‍लिकेशन्स बद्दल सांगितलं, "हे रुग्ण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आहेत. ज्यामध्ये रुग्णांना मळमळ, थकवा, केस गळणं, धडधडणं यांसारख्या समस्या येतायत."


डॉ. वाली पुढे म्हणाले, "या व्यतिरिक्त, ब्रेन फॉगची समस्या आहे म्हणजे स्मृती, लक्ष केंद्रीत करणं, मानसिक अस्थिरता अशा अनेक समस्या उद्भवतायत. काही लोकांना दृष्टी कमी होणं किंवा डोळ्यांमध्ये वेदना होण्याची तक्रार दिसतेय. हे सर्व पोस्ट कोविड सिंड्रोम आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या यांना दीर्घकालीन लक्षणं संबोधलं जाऊ शकतं."


दीर्घकालीन कॉम्‍प्‍लिकेशन्स ओळखणं फार महत्वाचं आहे. ज्यांना कोविड झाला आहे, त्यांनी या कॉम्‍प्‍लिकेशन्सवर लक्ष ठेवावं. काही रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे, हे अधिक बेडची गरज असल्याची चिन्हं आहेत. या रुग्णांना ICU ची गरज भासणार नाही पण ऑक्सिजनची व्यवस्था असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं, डॉ. वाली यांचं म्हणणं आहे.


गुरुवारी दिल्लीमध्ये कोविडचे 49 नवे रुग्ण आढळलेत. पॉजिटिव प्रकरणांचा दर 0.07 टक्के होता. तसंच, सलग दुसऱ्या दिवशी, राजधानीत कोविडमुळे कोणत्याही मृत्यूची नोंद झाली नाही.