How to come out from extra martial affairs: हल्ली समाजात एक्स्ट्रा मॅरिटयल अफेअरच्या (Extra Marital Affairs) चर्चा वाढू लागल्या आहेत. कधी प्रेम (Love), तर कधी डेटिंग (dating) करत लग्न झालेली मंडळी ऑफिस स्पाऊन्च्या (office spouse) नावाखालीही ओपनली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात. सध्याच्या काळात लोकांसाठी ही जीवनशैली (Lifestyle) झाली आहे. परंतु ही फार वाईट जीवनशैली (Bad Lifestyle Consequences) असून याचा परिणाम तुमच्या नात्यांवर (Relationship) फार वाईट पद्धतीनं होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्याचा विचार करत आपल्याला अशा घटनांपासून दूर राहायचे आहे. तेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरला धोका द्यायचा नसेल तर या काही अनमोल टीप्स फॉलो (Tips to follow) करा ज्यामुळे तुम्ही एक्ट्रा मॅरिटिएल अफेअर्समधून (Extra Marital Affairs) बाहेर पडू शकता. तुम्हीही चुकूनही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये अडकला असाल तर काळजी करू नका तुम्ही यातून आपली चूक लक्षात घेत आणि योग्य मार्गनं जात या अवस्थेतून बाहेर पडू शकता. याद्वारे तुम्ही यशस्वीरीत्या तुमचं वैवाहिक आयुष्य (Marriage Life) पुन्हा रूळावर आणू शकता. खाली आम्ही काही टीप्स दिल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि तूम्ही विवाहबाह्य संबंधांतून व्यवस्थित बाहेर पडू शकता. (extra matrial affairs health news these are the tips to stay away from extra matrial affairs)


एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे काय? (What is Extra Marital Affair)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैवाहिक नातेसंबंध सोडून एका पुरूषाचे किंवा एका महिलेचे इतर महिलेशी किंवा पुरूषाशी शारिरिक अथवा प्रेमसंबंध असतील तर त्याला विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affair Definations) म्हणतात. जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी मानसिक (Physical Relationships) किंवा शारीरिक संबंध ठेवते तेव्हा या संबंधांना समाजात फार गैर स्थान प्राप्त होतं. त्यामुळे समाजात तुमचे स्थानही खालावते. तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध नसणे, जोडीदारावर विश्वास नसणे, जबरदस्तीने लग्न करणे, आयुष्यात खूप व्यस्त असणे, जोडीदारापासून दूर राहणे इ. कारणे तुमच्या जोडीदाराच्या (Reasons of Extra Marital Affair) एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला कारणीभूत ठरू शकतात. 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


1. घाबरू नका, तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा : (Dont Fear Communicate)
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे नाती खराब होतात. कधी कधी अनेकांची प्रेम प्रकरणे इतकी घातक असतात की त्यांच्या नात्याचा शेवट घटस्फोटापर्यंत (Divorce) होतो. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावरच टिकतो. त्यामुळे तुमच्या जोडीदारावर विश्वास (Trust your partner) ठेवा आणि त्यांना तुमच्या अफेअरबद्दल माहिती द्या आणि त्यांना समजावून सांगा की तुम्ही कोणत्या परिस्थितीत हे पाऊल उचलले आहे. तूम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, तूम्हाला तेव्हा काय वाटते आहे याबद्दल तुमच्या पार्टनरशी (partner) शेअर करा, तुम्हाला नक्कीच तुमचा पार्टनरही मदत करेल. भविष्यात अशी चूक परत होणार नाही असा विश्वास तुमच्या पार्टनरला द्या. 


2. वेळ अमूल्य असतो, आपल्या जोडीदाराला वेळ द्या : (Give time to your partner)
जर तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून बाहेर यायचे असेल तर हळूहळू त्या गोष्टींकडे परत जायला सुरूवात करा ज्यांतून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खुश असायचात आणि तणावमुक्त असायचात. कारण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देत नसाल तर तुम्ही विवाहबाह्य संबंधांना बळी जाऊ शकता. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


3. लग्नाबाबत ट्रान्सपरंट राहा : (Be transprent of your marriage)
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये अनेक जण आपल्या लग्नाबद्दल गुप्तता पाळताना दिसतात. अनेकदा ते ज्या मुलीशी किंवा मुलाशी संबंधित असतील त्यांच्याशी आपल्या पहिल्या लग्नाबाबत खरं बोलत नाहीत. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीशी एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरमध्ये असाल त्यांचाही एकप्रकारे तुम्ही विश्वासघात (Break the trust)  करत असता त्यामुळे एकाच वेळी तुम्ही तिघांची आयुष्य बिघडवत असता तेव्हा असं करू नका आपल्या लग्नाबद्दल प्रामाणिक असणं फार आवश्यक आहे.  


4. समुपदेशकाची मदत घ्या : (Take Help of Councellor) 
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही समुपदेशकाची मदत घेऊ शकता. जसे शिक्षण समुपदेशक आहेत तसेच विवाह समुपदेशक देखील आहेत जे तुम्हाला अफेअरमधून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग सांगू शकतील कारण बर्‍याच वेळा अशी प्रकरणे औपचारिकपणे देखील संबंधित असतात तेव्हा तुमच्या समुपदेशकाचा सल्ला नक्की घ्या.