Eye Irritation Home Remedies : डोळा हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. त्यामुळे आपल्याला त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थोडासा तरी निष्काळजीपणा केला तर डोळ्यांना लगेच इजा होऊ शकते. डोळ्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या असल्या तरी आज आपण डोळ्यांच्या जळजळीबद्दल बोलणार आहोत. सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमध्ये आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रामुख्याने स्क्रीन टाइम वाढला किंवा हवेतील प्रदूषण वाढल्यास आपल्या डोळ्यांना जास्त त्रास होतो. (eye irritation home remedies cure treatment gulab)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल, आपण मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टॅबसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरतो. दीर्घकाळ काम केल्यावर डोळ्यात वेदना किंवा जळजळ होणे निश्चित आहे. चला जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.


डोळा दुखणे लक्षणे


- लाल डोळे
- डोळ्यात जळजळ
- डोळ्यांत पाणी येणे
- प्रकाशामुळे होणारी वेदना
- डोकेदुखी होणे


डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी उपाय


1. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी काकडी खा, किंवा त्याचे तुकडे करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे जळण्याची समस्या दूर होईल. फ्रीजमध्ये ठेवलेली थंडगार काकडी कापून डोळ्यांना लावल्यास त्याचा परिणाम चांगला होतो.


2. डोळ्यांची जळजळ आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्ही बटाटे देखील खाऊ शकता किंवा काकडीचे तुकडे करून डोळ्यांना लावा. काही वेळ वाट पाहिल्यानंतर बटाट्याचे तुकडे काढून डोळे स्वच्छ करा.


वाचा : Aadhar Card मधील माहिती अपडेट करायचीय ? पण, डिटेल्स किती वेळा बदलता येतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती…… 


3. डोळ्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता. हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही आणि डोळ्यांना त्वरित आराम देण्यासाठी प्रभावी आहे. जळजळ दूर करण्यासाठी सकाळ संध्याकाळ डोळ्यात गुलाब पाण्याचे 2 थेंब टाका.


4. कदाचित तुम्ही हा उपाय कधी ऐकला नसेल, पण डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही मध देखील वापरू शकता. डोळ्यात घातल्यावर थोडी जळजळ होते, परंतु समस्या दूर होईल.


 


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS NEWS याची पुष्टी करत नाही.)