Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील `हा` पदार्थ करेल तुमची मदत!
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.
Cholesterol: कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) शरीरात आढळणारी एक प्रकारची चरबी आहे जी अनेक हार्मोन्स (hormones) बनवते. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर (Health Tips) आणि मानसिक आरोग्यावर होतो. कोलेस्ट्रॉलची पातळी 240 किंवा त्याहून अधिक असेल तर ते खूप धोकादायक मानलं जातं. धमन्यांमध्ये वाढत असलेला कोलेस्ट्रेरॉल धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे योग्य डाएट आहारात घेणं आवश्यक आहे.
मेथी ठरते फायद्याची (Methi Khane Ke Fayde)
मेथीमध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते, त्याचा फायदाच होतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि जीवनसत्त्वे यामध्ये आढळतात, तसेच शरीराला फायबर (Fiber), कॅल्शियम (calcium), फॉलिक अॅसिड (folic acid), कॉपर (copper) आणि पोटॅशियम (potassium) भरपूर प्रमाणात मिळते.
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं. मेथीच्या दाण्यांमध्ये स्टेरॉइडल सॅपोनिन (steroidal saponin) आढळते, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या बिया चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढवतात.
अनेक संशोधनांमध्ये (Medical Research) असं आढळून आले आहे की, मेथीचे दाणे यकृतामध्ये उपस्थित असलेल्या एलडीएल रिसेप्टर्सला चालना देण्यासाठी तसेच लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करतात.
Cholesterol चे प्रकार -
कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. उच्च घनता लिपोप्रोटीन ज्याला एचडीएल (HDL) किंवा चांगले कोलेस्टेरॉल असं म्हणतात तर आणि कमी घनता लिपोप्रोटीन ज्याला एलडीएल (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात. एचडीएल तुमच्या पेशींचं आरोग्य चांगलं ठेवतं, तर एलडीएल तुमच्या धमन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे तुमच्या हृदयविकाराचा धोका वाढतो.