फर्टिलिटी वाढवण्यासाठी आहारात असायलाच हवीत ही `७` सुपरफूड्स!
फर्टिलिटी वाढवतील ही सुपरफूड्स...
मुंबई : सध्याची जीवनशैली धावपळीची आणि तणावाची आहे. याचा दुष्परिणाम फर्टिलिटीवर होतो. महिलांच्या PCOD, ओव्हरियन सिस्ट, फायब्रॉईड, ओवारीयन सिस्ट या सगळ्याचा परिणाम फर्टिलिटीवर होतो. तर पुरुषांमधील शारीरिक कमजोरी इंफर्टिलिटीला कारणीभूत ठरते. आहारात या सुपरफूडचा समावेश करून ही समस्या दूर करता येईल. पाहुया कोणते आहेत हे सुपरफूड्स...
# महिला आणि पुरुष दोघांसाठीही दूध पिणे गरजेचे आहे. दुधावरची मलाई न काढता दूध प्या. मलाई काढलेले दूध इंफर्टिलिटी वाढवते. कारण त्यात कॅल्शियम कमी असते. त्यामुळे मलाईयुक्त दूध प्या.
# मटारात झिंकचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे इंफर्टिलिटीची समस्या आटोक्यात येण्यास मदत होते. पुरुषांमध्ये स्पर्मची गुणवत्ता वाढवण्यासाठी मटारचे सेवन फायदेशीर ठरते.
# संत्र, लिंबूसारखी आंबट फळे पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढवण्यास मदत करतात. त्याचबरोबर स्पर्मचा अंड्यापर्यंत पोहचण्याचा स्पीड वाढतो. त्यामुळे बाळाचा विचार करत असाल तर ही फळे अवश्य खा.
# ऑलिव्ह ऑईलमुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते. महिला व पुरुष दोघांसाठीही याचे सेवन गरजेचे आहे.
# गर्भधारणा करण्यासाठी मदत करणारे हार्मोन नियंत्रित करण्यासाठी केळे उपयुक्त ठरते. यामुळे बी६ व्हिटॉमिन्सची कमतरता भरुन निघते. व्हिटॉमिन्सच्या कमतरतेमुळे स्पर्मची निर्मिती जलद होत नाही. त्यामुळे केळ्याच्या सेवनाने ही समस्या दूर करता येईल.
# बदामात व्हिटॉमिन ई असते त्यामुळे हेल्दी स्पर्मची निर्मिती होण्यास मदत होते.
# ब्रोकोलीत व्हिटॉमिन सी असते. यामुळे फर्टिलिटी वाढण्यास मदत होते. पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत होते.