Vitamin B Deficiency Food: सध्या आपल्या सगळ्यांची जीवनशैली (Vitamin B 12) ही खूप झपाट्यानं बदलते आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावरही होताना दिसतो आहे. त्यातून आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सही कमतरता असते. त्यामुळे आपल्यालाही अनेक अडचणींना सामोरे (What to Eat in Vitamin B 12 Deficiency) जावे लागते. येत्या काही काळात आपल्यालाही आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून सध्या व्हिटॅमिन बीची कमतरता अनेकांमध्ये वाढताना दिसते आहे. आपल्याला आपल्या आहारात त्यामुळेच योग्य त्या पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काही वाढते प्रदूषण, महागाई आणि जंक फूड (Junk Food and Health) याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो. तरूणांमध्येही व्हिटॅमिन्सची (Vitamin B Deficiency in Young) कमतरता वाढू लागली आहे. तेव्हा जाणून घेऊया की व्हिटॅमिन बीची कमतरता असली तर आपण कोणत्या पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. 


मुळात अनेकांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरताही पाहायला मिळते. तेव्हा अशावेळी दह्याचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य ठरेल. यात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. त्यातून तुम्ही दह्याची योग्य वेळ ठरवीत तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दह्यासोबतच (Yogart) तुम्ही बाकी अनेक पदार्थांचेही सेवन करू शकता. दही ही व्हिटॅमिन बीची कमतरता पुरी करते परंतु त्याचसोबतच सोयाबीनमधूनही तुम्हाला याचा फायदा मिळतो. यात नियासिन, बी 6 आणि फॉलेट असते ज्यातून तुमच्या आरोग्याला जास्त चांगला फायदा होतो. 


कोणत्या पदार्थांचा कराल समावेश? 


  • कडधान्यांचा वापर सुरू करा. 

  • दह्याप्रमाणे दुधाचेही सेवन करा. 

  • चणे, काळे हरभरे यांचाही समावेश करून घेऊ शकता. 

  • तुमच्या ब्रेकफास्टमध्ये डेयरी उत्पादनांचा समावेश करा. 

  • शाकाहारी पदार्थ जास्त खा. 

  • मांस, मासेही खाऊ शकता. 


व्हिटॅमिन बीची कमतरता असल्यास तुम्हाला कोणता त्रास होऊ शकतो? 


या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास थकवा येणे, त्वचा पिवळी पडणे. मुंग्या येणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे अथवा स्मरणशक्तीवर परिणाम होणे असे आजार उद्भवू शकतात. तेव्हा अशी लक्षणे आढळल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा तुम्हाला विविध आजारांचा सामना करावा लागेल. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावरही बेतू शकते. तेव्हा डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करा आणि हेल्थी खाण्यावर भर द्या. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)