Foot Odor: शूज किंवा चप्पल घातल्याने पायाला वास येतो, हे उपाय करा
शूज, चप्पल घातल्यानंतर काही लोकांच्या पायाला विचित्र वास येतो. पायातून येणाऱ्या या वासाला ब्रोमिहायड्रोसिस असेही म्हणतात. घ
Foot Odor Remove Tips: शूज, चप्पल घातल्यानंतर काही लोकांच्या पायाला विचित्र वास येतो. पायातून येणाऱ्या या वासाला ब्रोमिहायड्रोसिस असेही म्हणतात. घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी या समस्येने त्रस्त असलेले लोक, शूज किंवा चप्पल उघडताच त्यांच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरते. यासोबतच अशा लोकांच्या सॉक्सलाही दुर्गंधी येते. एखाद्या व्यक्तीला जास्त घाम येत असला तरी पायाला दुर्गंधी येण्याची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवू शकता.
दुर्गंधी दूर करण्यासाठी उपाय
मिठाचं पाणी: घरी आल्यावर पाय दररोज थोडावेळ मिठाच्या पाण्यात पाय भिजवून बसा. मिठाच्या पाण्याने पाय धुतले तर पायाला येणारा वास बर्याच अंशी दूर होतो. यासाठी तुम्ही अर्धा लिटर पाण्यात अर्धा कप मीठ टाकून त्यात पाय टाकून बसावे. 15 ते 20 मिनिटांनी पाय चांगले पुसून कोरडे करावेत.
व्हिनेगर: जुन्या बादलीत थोडे कोमट पाणी घेऊन त्यात एक कप व्हिनेगर टाका. नंतर थोडा वेळ पाय बुडवून ठेवा. 10 ते 15 मिनिटांनी पाय पुसून टाका. हा उपाय करून तुम्ही तुमच्या पायाला येणारा दुर्गंध दूर करू शकता.
बेकिंग सोडा: या उपायासाठी तुम्हाला फक्त पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाकावा लागेल. त्यानंतर त्यात काही वेळ पाय बुडवून बसावे लागेल. यामुळे दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया तर मरतीलच, पण पायाला संसर्गही होणार नाही.
अँटी-बॅक्टेरियल साबणाचा वापर: पायांचा वास दूर करण्यासाठी, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अँटी-बॅक्टेरियल साबणाचा वापर केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.
शूज आणि मोजे स्वच्छ ठेवा: जर तुम्ही चामड्याचे शूज किंवा सँडल घालत असाल सूर्यप्रकाशात ठेवा. शक्य असल्यास धुवून चांगल्या प्रकारे सुकवून घ्या. दुसरीकडे, दररोज चांगल्या डिटर्जंटने आपले मोजे स्वच्छ करा. यामुळे पायांना वास येण्याचं प्रमाण कमी होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)