मुंबई : ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. मग पहा अशा स्वरूपात खजूर खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी फायदे. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोटीन्स - प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. स


कॅलरी - कॅलरीचं गणित सांभाळून आहाराचं पथ्यपाणी सांभाळत असाल तर आहारात नक्कीच ताज्या खजुराचा समावेश करा. सुमारे ६० ग्रॅम ताज्या खजुरातून १४२ कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.


व्हिटॅमिन - ताज्या खजूरामध्ये व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी करण्यासाठी मदत होते.


मिनरल्स - ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास खजूर फायदेशीर आहे.