Garlic Roasted In Ghee Benefits: लसूण आणि तूप हे दोन्ही पदार्थ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतात. लसूण जेवणाची चव तर वाढवतोच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी, तूप त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते. पण तुम्ही कधी तुपात भाजून लसूण खाल्ले आहे का? तुपात लसूण भाजून खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. त्याचबरोबर तुपात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे अनेक आजार बरे करण्यास मदत करतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने शरीर आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी हे फायदेशीर सिद्ध होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पचनक्रिया सुधारते 
तुपात भाजून लसूण खाल्ल्याने पोटाला खूप फायदा होतो. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पाचक समस्यांपासून आराम मिळतो.


हृदयाचे आरोग्य राहिल चांगले 
तुपात भाजून लसूण खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. वास्तविक, लसणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर तुपामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.


रोगप्रतिकारशक्ती सुधारते 
लसूण आणि तूप दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तुपात भाजल्याने लसणाचे पोषण आणखी वाढते. याचे नियमित सेवन केल्यास सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शनच्या समस्यांपासून आराम मिळतो.


श्वसनाच्या समस्या होतात दूर 
तुपात भाजून लसूण खाल्ल्यास खोकला, दमा, ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळतो. याच्या सेवनाने शरीराला ऊब मिळते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे आणि श्वासासंबंधीच्या इतर समस्यांपासून आराम मिळतो. मुख्य म्हणजे हिवाळ्यात याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)