मुंबई : अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही. चहाचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध असतात. लवंग चहा त्यापैकीच एक. थंडीत लवंगाची चहा आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जाणून घ्या लवंगाच्या चहाच्या फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. सर्दीपासून बचाव करण्यासाठी लवंगाच्या चहाचा फायदा होतो. सर्दी झाल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा लवंगाचा चहा प्यायल्यास सर्दीपासून बचाव होतो.


२. ताप आल्यास लवंगाची चहा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. दरम्यान, अधिक काळ ताप राहिल्यास याचा प्रयोग करु नका.


३. अंग दुखत असल्यास लवंगाचा चहा जरुर प्यावा. 


४. पचनसंबंधी समस्या असल्यास लवंगाची चहा उपयोगी ठरतो. अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास तसेच पाचनशक्ती मंदावल्यास लवंगाचा चहा फायदेशीर ठरतो. 


५. दात दुखत असल्यास अनेकदा लवंगाच्या तेलाचा वापर केला जातो. मात्र त्याचबरोबर लवंगाच्या चहाचाही फायदा होतो. 


असा बनवा लवंगाचा चहा


एक चमचा लवंग बारीक वाटून घ्या. लवंगाची पूड एक कप पाण्यात टाकून १० मिनिटे उकळवा. जेव्हा पाणी उकळण्यास सुरुवात होईल तेव्हा अर्धा चमचा चहाची पावडर टाका. काही मिनिटे चहा उकळल्यानंतर गाळून घ्या. याला थंड करा. हवे असल्यास तुम्ही हा चहा फ्रीजमध्ये स्टोर करुन ठेवा.