मुंबई : अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो. पण कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी हा सल्ला नक्की वाचा कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे.  लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर


सूपमध्ये समावेश - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार कांद्याच्या सालीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असतात. त्यामुळे सूप बनवताना कांद्याची सालं त्यामध्ये मिसळा. सूप पिताना कांद्याची साल काढून टाका. 


घशातील खवखव 


घशातील खवखव कमी करायची असेल तर पाण्यामध्ये कांद्याची सालं मिसळा. गाळलेले पाणी गुळण्या करण्यासाठी वापरा. यामुळे घशातील खवखव कमी करण्यासाठी मदत होते. 


रक्तदाब 


कांद्याच्या सालीमध्ये क्वॅरसेटीन नावाचे फ्लेनोवल असते. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. कांद्याचे हे ७ चमत्कारीक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?


डास घरापासून दूर  


कांद्याच्या साली फायदेशीर आहेत. घरातील किडे, कीटकं, डास यांना हटवण्यासाठी फिनाईलप्रमाणेच कांद्याची सालही काम करते. 
रात्रभर कांद्याच्या साली पाण्यात भिजत ठेवा. या पाण्याला दुसर्‍या दिवशी खिडकी आणि दरवाज्यासमोर ठेवावे. या पाण्याचा वास उग्र असतो. या वासानेच घरातील किडे दूर जातात. डेंग्यूचे मच्छर हटवण्यासाठीही कांद्याची साल फायदेशीर आहेत.  या '5' नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांंनी दूर पळवा ढेकणांंचा त्रास