कांद्याचे हे ७ चमत्कारीक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

स्वयंपाकघरात पदार्थाचा स्वाद वाढवणारा कांदा इतका गुणकारी आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल. 

Updated: Apr 13, 2018, 05:55 PM IST
कांद्याचे हे ७ चमत्कारीक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

मुंबई : स्वयंपाकघरात पदार्थाचा स्वाद वाढवणारा कांदा इतका गुणकारी आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल. कांद्याचा स्वाद अनेकांना आवडतही नाही. पण त्याचे फायदे चमत्कारिक आहेत. कांद्याच्या या गुणधर्मांचा वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने सर्मथन केले आहे. तर एक नजर टाकूया कांद्याच्या आरोग्यदायी फायद्यांवर...

व्हिटॉमिन्स आणि मिनरल्सचे भांडार

कांद्यात नैसर्गिक साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात मिनरल्स, सोडिअम, पोटॅशिअम, आयर्न आणि फायबर्सचेही मुबलक प्रमाण असते. त्याचबरोबर यात फॉलिक अॅसिडही असते. फॉलिक अॅसिडची गरज प्रेग्नंसीमध्ये महिलांना आणि बाळाला अधिक असते.

इंफेक्शन कमी करण्यास

कांद्यात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये कमी करण्यास याचा फायदा होतो.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

कांद्यात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसंच अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो.

रक्तप्रवाह सुधारतो

कांद्यात क्रोमियम असते त्यामुळे शरीरातील रक्तसंचार सुरळीत राहतो. त्याचबरोबर ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. परिणामी हृदयाचे आरोग्य राखले जाते.

हिटस्ट्रोकपासून बचाव

उन्हाळ्यात कांदा खाणे खूप उपयुक्त ठरते. हिटस्ट्रोकपासून बचावात्मक उपाय म्हणून कांदा सेवन करा.

दुखण्यावर

किडा चावल्यास कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रसामुळे दुखण्यावर, जळजळीवर आराम मिळतो. त्याचबरोबर कान दुखत असल्यास कांद्याच्या रसाचे २-३ थेंब कानात घातल्याने कानदुखी कमी होते.

अॅसिडिटीवर फायदेशीर

अॅसिडिटीवर आराम मिळण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. त्यासाठी कांद्याच्या रसात, थोडं आलं-लसणाचा रस घाला. त्यात १ चमचा मध आणि २ चमचे पाणी घाला. मिश्रण तयार करा आणि दिवसातून एकदा घ्या. त्यामुळे गॅसपासून सुटका होईल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x