Coffee Health Benefits: कॉफीचं नाव ऐकताच त्यातून मिळणाऱ्या उर्जेचं स्मरण अनेकांना होतं. कॉफी (Coffee) पिताच ताजेपणा वाटू लागतो. अनेक अहवालांमध्ये, कॉफीचं अतिसेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं वर्णन केलं जातं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॉफीमध्ये कॅफिन हा मुख्य घटक आहे, ज्यामुळे शरीरातील बहुतेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉफीच्या अतिसेवनाने आजार होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अंदाजानुसार, जगभरातील लोक दररोज सुमारे 2.25 अब्ज कप कॉफीचे सेवन करतात. तर दुसरीकड काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक गंभीर आजारांमध्ये फायदे मिळू शकतात. कॉफी अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. 


कॉफीचे फायदेबाबत बोलायच झाल  तर कॉफीमध्ये अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2), नियासिन (व्हिटॅमिन बी 3), मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स कॉपीमध्ये असतात. तज्ञांच्या मते, या पोषक तत्वांचा मानवी शरीराला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो.


टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी


तसेच कॉफीच्या सेवनाने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. 2014 च्या अभ्यास अहवालानुसार, 48,000 हून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आले. चार वर्षांमध्ये दररोज किमान एक कप कॉफी पितात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका 11 टक्के कमी असतो. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉफीचे सेवन करावे.


वाचा: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का? 


चरबी कमी करण्यास मदत करते


कॅफीन चयापचय दर 3-11 टक्क्यांनी वाढवू शकते. म्हणूनच कॉफीला फॅट बर्निंग पूरक मानले जाऊ शकते. लठ्ठ लोकांची चरबी कमी करण्यासाठी कॅफिन उपयुक्त ठरू शकते.  


यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी असतो


कॉफीच्या सेवनाने यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. एका यूएस अभ्यासात असे दिसून आले आहे की जे सहभागी दररोज दोन ते तीन कप कॉफी पितात त्यांना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि तीव्र यकृत रोग होण्याचा धोका कमी होतो.


कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो


तसेच कॉफीमध्ये आढळणारे कॅफीन रक्तदाबासह हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांपर्यंत कमी होतो.


कॉफी पिण्याचे तोटे


पचन होण्याचा धोका


कॉफीच्या सेवनाने पोटात ऍसिडचे उत्पादन वाढते. त्याच वेळी, कॅफीन देखील शरीरासाठी हानिकारक स्टोमा ऍसिड तयार करण्याचे कारण बनू शकते. त्यामुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कॉफीचे अतिसेवन किंवा कॉफीने सकाळची सुरुवात केल्याने अपचन, गोळा येणे, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


निर्जलीकरण


 सकाळच्या कॉफीने दिवसाची सुरुवात करणे हानिकारक ठरू शकते. रात्री बराच वेळ पोट रिकामे राहते आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळी पाणी प्यावे. पण सकाळी कॉफी प्यायल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन लघवी वाढवते, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका देखील वाढू शकतो.


 


 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)