मुंबई : आजकाल धकाधकीच्या जीवनात लोक मिळेल ते खातायत. आपल्या आरोग्यावर या पदार्थांचा किती फरक पडेल याचा काही एक विचार न करता लोकांचं हे सुरुच आहे. मात्र तुम्हाला माहीतीय का रात्रीच्या वेळी आहारातून या पाच गोष्टींना टाळलं पाहिजे. ही गोष्ट टाळल्यास तुम्हाला अनेक आजारांपासून दूर राहता येईल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसालेदार अन्न 
भारतीय जेवण मसाल्याशिवाय पूर्ण होतंच नाही. पण रात्री मसालेदार पदार्थ खात असाल तर आजपासूनच सोडा. कारण या खाद्यपदार्थात वापरण्यात येणारे तेल आणि तूप अतिशय घातक आहे. हे खाल्ल्याने तुमच्या छातीत जळजळ होऊ शकते. भविष्यात हृदयाशी संबंधित आजारही तुम्हाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री मसालेदार पदार्थ टाळावेत


चिकन-मटण-बिर्याणीपासून सावधान
जर तुम्ही रात्रीच्या वेळी चिकन-मटण बिर्याणी खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या कारण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. अशा अन्नामध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. फक्त मटण बिर्याणीबद्दल बोलायचे झाले तर एका छोट्या सर्व्हिंगमध्ये 500-700 कॅलरीज असतात. त्याचे पचन अधिक वेळ घेते आणि त्यामुळे तुमची दिनचर्याही बिघडू शकते.


पकोडा
संध्याकाळी ७ वाजल्यानंतर पकोडे खाण्चाचा मोह होत असेल तर तो आवरा. कारण ते तुमच्या पोटासाठी अजिबात चांगले नाही. पकोडे बराच वेळ तेलात तळले जातात. हे ऍसिड फूडसारखे कार्य करते. रात्री ते खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. यामुळे तुमची झोपेत देखील व्यत्यय आणू शकते जे अनेक रोगांचे मूळ आहे.


मिठाई
मिठाई देखील संध्याकाळी 7 नंतर खाऊ नये, कारण ते तुमच्या शरीराच्या झोपेच्या पद्धतीमध्ये अडथळा आणू शकते. रात्रीच्या जेवणानंतर मिठाईचे सेवन केल्याने अन्न पचण्यास त्रास होतो. शरीरात ते उत्तेजक म्हणून काम करते आणि तुम्हाला झोपू देत नाही.


रात्री कॉफी पिणे टाळा
अनेकदा रात्री झोप न आल्याने अनेकजण कॉफी पितात. तुम्हीही असे करत असाल तर हे करणे टाळा. कारण जेव्हा तुम्ही चहा, कॉफी किंवा ग्रीन टी सारखी कॅफिनयुक्त पेये पितात तेव्हा त्याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्री कॉफी पिणे टाळावे.


 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)