Healthy drinks to reduce cholesterol levels: कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवण्यासाठी निरोगी आहाराची मोठी भूमिका असते. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि पार्किन्सन्स या आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज घेणारा आहार आवश्यक आहे. हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.


टोमॅटोचा रस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन लिपिड पातळी सुधारण्यास मदत करतं आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. टोमॅटोमध्ये असलेले नियासिन आणि फायबर देखील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. टोमॅटोचा रस आठवड्यातून दोन ते तीनदा पिणं फायदेशीर ठरेल.


ग्रीन टी


कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असलेल्या व्यक्तींनी ग्रीन टी प्यावा. हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन आणि इतर अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. हे एक आरोग्यदायी पेय आहे, जे तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.


कोको पेय


कोको फ्लेव्होनॉइड्स सारख्या अँटिऑक्सिडंटने भरलेले असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतं. कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी मोनो-सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड देखील उत्कृष्ट आहेत. 


सोयाबीन दुध


गाईच्या दुधाऐवजी, कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले सोया दूध वापरण्याचा प्रयत्न करा. हृदयरोगी सोया दुधाचं सेवन करू शकता.