थंडाई पिण्याचे आश्चर्यकारक ४ फायदे
ऱंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीनिमित्त देशभरातील बाजार रंगानी भरुन गेलेत. रंगपंचमीची तयारीही जोरात सुरु आहे. रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते. जाणून घ्या थंडाई पिण्याचे फायदे
मुंबई : ऱंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीनिमित्त देशभरातील बाजार रंगानी भरुन गेलेत. रंगपंचमीची तयारीही जोरात सुरु आहे. रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते. जाणून घ्या थंडाई पिण्याचे फायदे
बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर
फूड न्यूट्रिशनिस्ट प्रियंका अग्रवाल सांगतात, होळीच्या दिवसात प्यायली जाणारी थंडाई इतर दिवशीही पिऊ शकतात. थंडाईमध्ये खसखस असल्याने पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होता. थंडाईमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मिनरल्स सारखी पोषकतत्वे असतात.
पाचनक्रिया सुधारते
थंडाईमध्ये बडिशेपही टाकली जाते. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. गॅसच्या समस्या दूर होतात. बडिशेपमध्ये अँटी इंफ्लेमेट्री गुण असतात ज्यामुळे पाचनक्रिया सुधारते.
एनर्जीने भरपूर
थंडाईमध्ये टरबुजाच्या बियांचाही वापर केला जातो. ज्यामुळे नॅचरल एनर्जी मिळते. याशिवाय थंडाईमध्ये बदाम आणि पिस्ताचाही वापर केला जात असल्याने शरीराला ताकद मिळते.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते
थंडाईमध्ये काळी मिरी आणि लवंगाचा वापर केला जातो. या मसाल्यांमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. थंडाईमध्ये केसर मिसळल्याने ते अँटी डिप्रेशन आणि अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते. जे आरोग्यासाठीही चांगले आहे.