Mouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग `हा` उपाय नक्की करुन पाहा
तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना तोंडात फोड येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागलं असेल. तोंडात फोड येणे ही एक सामान्य समस्या आहे. हे फोड गालावर, जिभेवर आणि ओठांच्या आतील भागात येतात. ज्यामुळे आपल्याला काहीही गरम किंवा थंड, तसेच तिखट गोष्टी खाताना त्रास होतो. एवढंच नाही तर साधं बोलताना किंवा पाणी पितानाही आपल्याला त्रास होतो. तोंड येण्याच्या या समस्येला अल्सर असं देखील म्हणतात.
तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते. त्यामुळे दीर्घकाळ तोंडात फोड येण्याची समस्या असल्यास त्यावर ताबडतोब उपचार करा.
त्याचबरोबर अल्सरच्या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तोंडाच्या फोडांपासून सुटका मिळू शकेल.
तोंडात फोड आल्यास या पद्धतींचा अवलंब करा-
लिंबू आणि मधाच्या पाण्याने गुळण्या करा
लिंबू आणि मधाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाच्या अल्सरची समस्या दूर होते. हे पाणी तयार करण्यासाठी, एक ग्लास पाणी गरम करा. आता त्यात एक लिंबू आणि मध घाला. पाणी नीट मिसळल्यानंतर थोडावेळ राहू द्या. जेव्हा पाणी तोंडात घालण्यास योग्य होईल तेव्हा त्या पाण्याने गुळण्या करा, असे केल्याने अल्सरची समस्या दूर होऊ शकते.
ग्लिसरीन आणि हळद
ग्लिसरीन आणि हळद पावडर ही अल्सरची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे फोडातील जळजळ कमी होते. ते वापरण्यासाठी ग्लिसरीनमध्ये थोडी हळद मिसळा. आता ते तुमच्या फोडांवर लावा. सुमारे 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा, असे केल्याने अल्सरची समस्या दूर होईल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)