या `3` घरगुती उपायांंनी रातोरात हटवा पिंपलचा त्रास
कधी हार्मोन्सच्या असंतुलित प्रमाणामुळे तर कधी त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने चेहर्यावर पिंपल्स येतात.
मुंबई : कधी हार्मोन्सच्या असंतुलित प्रमाणामुळे तर कधी त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने चेहर्यावर पिंपल्स येतात. एखाद्या पार्टी किंवा सोहळ्याच्या दिवसात नेमका पिंपल आला तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे. पण रातोरात असा एखादा पिंपल हटवण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातीलच काही पदार्थ मदत करू शकतात.
कसा दूर कराल पिंपल्सचा त्रास ?
रातोरात पिंपलचा त्रास टाळण्यासाठी तुम्हांला मेकअप करून लपवण्याची किंवा महागड्या क्रीम्सची मदत घेण्याची काही गरज नाही. त्याऐवजी तुमच्या घरातील हे काही पदार्थ ठरतील फायदेशीर
टुथपेस्ट -
पिंपल वाढू नये म्हणून त्यावर टूथपेस्ट लावण्याचा मार्ग अनेकजणी निवडतात. मात्र ज्या टुथपेस्टमध्ये triclosan हे अॅन्टी बॅक्टेरियल असतात. त्यामुळे अॅक्नेचा त्रास वाढवणार्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत होते. त्यामुळे हे तपासूनच टुथपेस्ट लावा.
कसा कराल उपाय
या उपायाकरिता पिंपलवर आधी बर्फाचा तुकडा दाबा. काही वेळाने चेहरा पुसून त्यावर टुथपेस्ट लावा. 15-20 मिनिटांनी टुथपेस्ट साध्या पाण्याने स्वच्छ करा.
मात्र तुमची त्वचा संवेदनशील असल्यास किंवा त्यामध्ये इतर काही त्रासदायक घटक असल्यास त्वचेवर खाज येऊ शकते. टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?
मध आणि दालचिनी
मध आणि दालचिनी पावडर एकत्र करा. हे मिश्रण पिंपलवर दाबा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. रात्री हा उपाय केल्यानंतर सकाळी पिंपलचा आकार कमी झालेला दिसेल.
लवंग आणि लसूण
तुम्हांला लसणाच्या वासचा त्रास नसेल तर तर लसूण आणि लवंग यांची एकत्र पेस्ट रात्री पिंपलवर लावा. सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
अॅपल सायडर व्हिनेगर
कापसाच्या बोळ्यावर अॅपल सायडर व्हिनेगर लावा. यामुळे रात्री पिंपल सुकायला मदत होते. सकाळी पिंपलचा आकार कमी होण्यास मदत होते. ५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब