टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?

 ज्या खास दिवशी तुम्हांला नटून थटून बाहेर पडायचं असतं नेमका तेव्हाच चेहर्‍यावर पिंपल  वाढायला सुरवात होते. आणि मग त्याला लपवण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात.

health.india.com | Updated: Aug 11, 2017, 04:04 PM IST
टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?  title=

मुंबई :  ज्या खास दिवशी तुम्हांला नटून थटून बाहेर पडायचं असतं नेमका तेव्हाच चेहर्‍यावर पिंपल  वाढायला सुरवात होते. आणि मग त्याला लपवण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात.

अगदी हळद, कोरफड पासून थेट टुथपेस्ट  पिंपलवर लावली जाते. पण खरंच टुथपेस्ट लावून त्रास कमी होतो का ? यासाठी डरमॅटोलॉजिस्ट  सेजल शहा यांचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

टुथपेस्टने अ‍ॅक्ने कमी होतात का ?
टुथपेस्टमध्ये triclosan हे अ‍ॅन्टी बॅक्टेरियल असतात. त्यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढवणार्‍या बॅक्टेरियांना  नष्ट करण्यास मदत होते. पण triclosan चा वापर करावा की करू नये याबाबत अनेक मतं आहेत. Triclosan मुळे शरीरात हार्मोन्सची पातळी वर खाली होऊ शकते. त्यामुळे अनेक कंपनी त्याचा वापर टाळतात. त्यामुळे ज्या टुथपेस्टमध्ये triclosan  नाही त्याचा वापर अ‍ॅक्नेवर केल्यास कोणताच परिणाम दिसणार नाही.

टुथपेस्ट लावल्याने काही दुष्परिणाम दिसतात का ?
टुथपेस्टमध्ये बेकिंग सोडा, मेथॉल, हायड्रोजन पेरॉक्साईड यासारखे ड्राईंग घटक असतात. त्यांचा वापर पिंपलचा आकार कमी करण्यासाठी होऊ शकतो. मात्र अल्होहल आणि बेकिंग सोड्याचं एकत्र येणं त्वचेला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे खाज येण्याचं प्रमाण वाढतं.

टुथपेस्टमधील घटकांचा त्रास किंवा अ‍ॅलर्जी असल्यास, तुमची त्वचा संवेदनशील असल्यास त्रास अधिकच गंभीर होतात. टुथपेस्टचा त्वचेवर अधिक प्रमाणात वापर केल्यास पिलिंग आणि त्वचेचा लालपणा वाढणं या समस्या वाढतात. तसेच त्वचेमधेय मेलॅनिन अधिक प्रमाणात असल्यास हायपर पिंगमेंटटेशनचा त्रास वाढू शकतो. त्वचेवर फार काळ टुथपेस्ट राहिल्यास त्वचा जळजळते, लालसर होते.

टुथपेस्टचा वापर करून तुम्हांला अ‍ॅक्नेचा त्रास कमी करायचा असेलच तर त्यामधील फॉर्म्युला तपासून पहा. त्यामध्ये व्हाईटनर्स, रंग  नसावेत. यामुळे त्वचा अधिक जळजळू शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x