Changing Your Sleep Habits: गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये हृदयविकारांचा (Heart Attack) धोका वाढल्याचे दिसत आहे. याला अनेक तरुणांची बदलती जीवनशैली, खाण्याची सवयी, अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण तुम्हाला हे माहितीये का झोप पूर्ण न झाल्यास तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकते. अनेक गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात. तसंच, शारीरिक आणि मानसिक स्थितीवरही त्याचा गंभीर परिणाम होतो. इतकंच नव्हे तर, झोपेच्या या वाईट सवयींमुळं हृदयविकाराचा धोकाही जाणवतो. (Insomnia)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोप पूर्ण व होणे तर झोपेसंबंधी असलेल्या वाईट सवयींमुळं हृदयविकाराचा धोका जाणवतो. आजच्या धावपळीच्या युगात व बदलत्या जीवनशैलीमुळं झोप पूर्ण होत नाही. अशावेळी जर पूर्ण झोप शरीराला मिळाली नाही तर ऑटोनोमिक नर्व्हस सिस्टीमवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळं कार्डियोवैस्कुलर सिस्टिमवर परिणाम होते. झोप कमी झाल्यामुळं सिंपेथिक नर्व्हस सिस्टिमची अॅक्टिव्हिटी वाढते. त्याचा आपल्या हृयावर हानिकारक प्रभाव पडतो. तसंच, या असंतुलनामुळं रक्तदाब वाढतो. त्यामुळं हार्ट रेट आणि स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोल वाढण्याची भीती असते. 


झोप पूर्ण न झाल्यामुळं हृदयावर त्याचा गंभीर परिणाम होतो. कारण झोप अर्धवट झाल्याने दिवसभर थकवा जाणवतो त्यामुळं रक्तप्रवाह बाधित होतो आणि त्याचा परिणाम  हृदयाच्या पंपिंगवर होतो. आजकाल तरुण वयात हार्ट अॅटेक येण्याच्या समस्या तीव्र होत आहेत. कारण काही चुकींच्या सवयींमुळ तरुणांना हृदयविकाराचा धोका जाणवतो. 


झोप न येण्याची कारणे 


ज्या लोकांना स्मोकिंगची सवय असते त्यांना झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 


रात्री चहा-कॉफी म्हणजेच कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास अनिद्राची समस्या निर्माण होते. 


नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचे बायॉलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होते. त्यामुळं त्यांनाही झोपेच्या समस्या निर्माण होतात. 


तसंच, बिछान्यावर झोपून तास् नतास मोबाइल फोनचा वापर करणाऱ्या लोकांचे मेलाटॉनिन हार्मोन असंतुलीत होते. 


झोप पूर्ण न झाल्यास या आजारांचा धोका संभवतो


जे लोक झोप पूर्ण घेत नाहीत किंवा याबाबत लापरवाही दाखवतात त्यांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. यात थकवा, तणाव, मूड खराब होणे, ब्लँक होणे, आत्मविश्वास कमी होणे तसंच, मानसिक आणि भावनात्मक समस्यादेखील आहेत.