Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल
knowldege news : आई होणार ही भावना महिलांसाठी सगळ्यात मोठा आनंद घेऊन येतो. आपण प्रेग्नेंट (pregnant) आहोत हे आपली मासिक पाळी चुकी आणि त्यानंतर प्रेग्नेंसी टेस्ट केल्यावर कळतं. पण तुमच्या घरातील श्वानला (dog) सगळ्यात पहिलं कळतं तुम्ही आई होणार आहेत ते...
Can Dogs Sense women Pregnancy : अनेकांकडे आजकाल पाळीव प्राणी (pets) असतात. कोणाकडे श्वान (Dog) तर कोणाकडे मांजर (cat). इमारतीतील एक दोन तीन घरं सोडली तर अनेकांकडे श्वान असतात. क्यूट डॉग (Cute dog) कधी आपल्या घरातील एक सदस्य आपल्याला कळतं देखील नाही. डॉग्ज आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांवर खूप जीव लावतो. त्यांची काळजी घेतो, घराचं रक्षण करतो. गेल्या काही दिवसांमध्ये पाळीव कुत्र्यांचा हल्ल्याचा अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण श्वान घरात असल्यामुळे अनेक फायदेही होतात. हे खरंय की श्वानने आपल्या घरातील सदस्यांवर हल्ला केल्याचाही घटना आपण पाहिल्या आहेत. पण या डॉग्जची अजून एक खासियत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Sixth Sense ची कमाल!
तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर प्रेग्नेंट (pregnant) असाल तर त्याच्या श्वानला ते पहिले कळतं. श्वान हा वासावर अनेक गोष्टींचा छडा लावत असतो. त्याची वासाची क्षमता ही माणसापेक्षा 40 टक्के जास्त असते आणि संवेदनशील प्राणी आहे. माया लावणारा, मालकाशी प्रामाणिक असलेला प्राणी, त्याचा सच्चा दोस्त. पण कसं कळतं त्याला आपण प्रेग्नेंट आहोत ते.
श्वान कसा ओळखतो तुम्ही प्रेग्नेंट आहात ते?
या विषयावर तसा वैज्ञानिकदृष्टीकोनातून कुठलाही अभ्यास झालेला नाही. मात्र ज्यांच्या घरी डॉग आहे त्यांनी आपला अनुभव सांगितला आहे. त्या अनुभवावरुन असं म्हटलं जातं की श्वानला आपल्या शरीराच्या सुगंधाने समजून जातो की आपण प्रेग्नेंट आहोत आणि मग डॉगच्या वागण्यातही बदल जाणवायला लागतो. आपण प्रेग्नेंट असलो की आपल्या शरीरात हार्मोन्स (hormones) बदल होता त्यामुळे शरीराचा सुगंधही बदलतो. त्यामुळे बदलेल्या सुंगधावरुन श्वानच्या वागण्यात बदल होतो. याचा अर्थ आपण असं नाही म्हणू शकतं नाही की त्याला आपण प्रेग्नेंट आहोत ते कळलं. हा फक्त एक अंदाज आहे. पण यावर संशोधन सुरु आहे.
श्वानात जाणवतात 'हे' बदल
श्वान आपल्या मालकीणीबद्दल जास्त जागृत होतात.
मालकीणचं लक्ष वेधण्यासाठी तो अनेक गोष्टींसाठी हट्ट करतो.
अनेक वेळा तो मालकीणीच्या अंगाशी चिकटतो.
मालकीण प्रेग्नेंट असल्याने घरात झालेले बदल स्विकारणे श्वानला जड जात असल्याने त्याचा वागण्यात बदल होतो.
मग अशावेळी श्वानावर जास्त प्रेम (Love) करा
श्वानासाठी त्याची मालकीणच त्यांचं आयुष्य असते. तिच्या अवतीभवती त्यांचं जग असतं. त्यामुळे तिच्यामधील झालेले बदल हे त्यांना पटकन कळतात. त्यात जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर ते तुमच्या प्रती जास्त प्रोटेटिव्ह (Protative) वागतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट असल्याने या परिस्थितीशी तुम्हीही जुळून घेत असतात. अशात तुमच्या श्वानला तुमचं प्रेम (Love) राहिलं नाही ही भावना येऊ शकते. म्हणून या काळात त्यांच्यावर जास्त प्रेम करा. श्वानला या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी मदत करा.