4.9 सेकंदात 100 चा स्पीड पकडणार; 9 गियर असलेली सुपरकार लाँच; किंमत पाहून ठरवा घ्यायची की नाही?

Mercedes कंपनीने आपली नवी पावरफुल कार लाँच केली आहे. 

| May 22, 2024, 18:44 PM IST

Mercedes-Maybach GLS 600 : Mercedes या लक्झरियस कार कंपनीने आपली नवी सुपरकार लाँच केली आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे जबरदस्त स्पीड. ही कार अवघ्या 4.9 सेकंदात 100 चा स्पीड पकडणार आहे. या कारमध्ये नऊ गियर देण्यात आले आहेत. जाणून घेऊया या कारचे बेस्ट फिचर्स आणि किंमत.

1/7

 Mercedes कंपनीने Maybach GLS 600 ही दमदार कार भारतात लाँच केली आहे. 

2/7

Mercedes-Maybach GLS 600 या कारची स्टार्टिंग किंमत 3.35 कोटी इतकी आहे. 

3/7

अवघ्या 4.9 सेकंदात ही कार 100 चा स्पीड पकडते. या कारचा टॉप स्पीड 250 km इतका आहे. 

4/7

 या कारमध्ये 4.0 लिटर क्षमतेचे ट्विन टर्बोचार्ज्ड V8 इंजिन देण्यात आले आहे. यासह 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.   

5/7

बर्मेस्टर सराउंड साउंड सिस्टम, एमबक्स हाई-एंड रियर सीट एंटरटेनमेंट सिस्टम, हाई-बीम असिस्टसह मल्टीबीम LED, थर्मल आणि नॉईज़ इंसुलेशनसह गार्ड 360-डिग्री बर्गलरी-रजिस्टंट, लॅमिनेटेड सेफ्टी ग्लास, कम्फर्ट पॅकेज, अपग्रेडेड पार्किंग असिस्टंट असे फिचर्स मिळतात.  

6/7

MBUX सॉफ्टवेअर आणि नवीन ग्राफिक्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. यामुळे फिंगरप्रिंट सेन्सर आणि हँड जेश्चर असे हायटेक फिचर्स मिळतात  

7/7

जगभरात अनेक ठिकाणी ठिकाणी Maybach GLS 600 ही कार अधीच लाँच झाली आहे. भारतात ही कार लाँच करण्यापूर्वी याच्या डिजाईन आणि फिचर्समध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.