मुंबई : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अशात भारत बायोटेकने दावा त्यांच्या लसीसंदर्भात मोठा दावा केला आहे. भारत बायोटेकच्या म्हणण्याप्रमाणे, कोवॅक्सिनचा बूस्टर डोस कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची क्षमता कमी करण्यासाठी प्रभावी आहे. अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमोरी लस केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक मेहुल सुथर यांनी सांगितलं की, "प्राथमिक डेटा पाहिला तर कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस घेणार्‍या लोकांना ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटपासून संरक्षण मिळतं. या निष्कर्षांनुसार बूस्टर डोसमध्ये तीव्रता आणि हॉस्पिटलायझेशन कमी करण्याची क्षमता आहे."


अल्फा, बीटा, डेल्टा, आणि कप्पा यांसारख्या कोरोनाच्या व्हेरिएंटविरोधात कोवॅक्सिनची क्षमता चांगली असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालंय, असं कंपनीने म्हटले आहे. 


हैदराबादमधील फार्मास्युटिकल कंपनी भारत बायोटेकने सांगितले की, नुकतंच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की, ज्या लोकांना कोवॅक्सीनचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यांनी 6 महिन्यांनंतर लसीचा बूस्टर डोस घेतल्यावर ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंट निष्प्रभावी झाले.


भारत बायोटेकने पुढे सांगितलं की, खास तयार करण्यात आलेले हे लसीचे डोस प्रौढ आणि मुलांना दिले जाऊ शकतात. कोवॅक्सीन ही रेडी-टू-यूज, लिक्विड लस आहे, ज्याचा साठा 2-8 °C वर केला जातो.


ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता, अनेक देशांनी खबरदारी म्हणून तिसरा बूस्टर डोस देण्यास सुरूवात केली आहे. भारताने 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांसाठी सावधगिरीचा डोस म्हणजेच बूस्टर डोस देण्यास सुरू केलीये.