मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकजण सकाळी उठून जीममध्ये जायला कंटाळा करतात. कधी मुसळधार पाऊस तर कधी सकाळचा अल्हाददायक गारवा यामुळे गोधडी गुंडाळून झोपून जावं असं तुम्हांला वाटत असेल. पण सकाळच्या मुसळधार पावसामुळे जीममध्ये जाणं वारंवार घडत असेल तर तुमच्या वजनाचा काटाही वाढत राहणार. अशावेळेस काही घरगुती उपायांनी तुम्ही वजन घटवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ वजन घटवण्यास मदत करतात. अशापैकी एक म्हणजे जिरं. पचन सुधारण्यासोबतच शरीराच्या मेटॅबॉलिक रेटला चालना देण्यासाठी जिरं मदत करतं. त्यामुळे परिणामकारक आणि सुरक्षितपणे वजन घटवण्यासाठी जिरं फायदेशीर आहे. ... म्हणून काहींचे पदार्थांवर ताव मारूनही वजन वाढत नाही


वजन घटवण्यासाठी कसा कराल जिर्‍याचा वापर 


दोन चमचे जिरे आणि कपभर पाणी हे मिश्रण एकत्र उकळा. 


जिर्‍याचं पाणी उकळल्यानंतर ते गाळा. 


हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरते. 


हा उपाय नियमित आठ आठवडे किंवा तीन महिने सलग केल्यास परिणामकारकपणे वजन घटवण्यास मदत होते. झोपण्यापूर्वीच्या या '5' चुकांंमुळे आटोक्याबाहेर जातयं तुमचं वजन