मुंबई : अनेक मुलांना क्लिन बिअर्ड लूक आवडतो. त्यामुळे सातत्याने शेव्हींचा पर्याय निवडला जातो. अशावेळी आठवड्यातून २-३ वेळा शेव्हींग हमखास केले जाते. पण सातत्याने शेव्हींग केल्याने त्वचेवर डाग पडतात. त्याचबरोबर त्वचा खराब होते. तसंच त्वचा सैल पडण्याची आणि काळसर होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी शेव्हींग करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 


शेव्हींगपूर्वी काय कराल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेव्हींग करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हलक्या कोमट पाण्याचा उपयोग करा. त्यामुळे दाढी करताना कमी जळजळ होईल आणि शेव्ह देखील सहज, स्मूथ होईल. कोमट पाण्यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जातो आणि डेड स्किन दूर होते. 


शेव्हींग करताना अनेकदा कट्स जातात. ईजा होते. त्वचेवर जळजळ जाणवू लागल्यास समजा की आता रेझर बदलण्याची गरज आहे. रेझरमुळे पिंपल्स येत असल्यास किंवा खाज, जळजळ जाणवत असल्यास इलेक्ट्रिक रेझरचा वापर करा. 


दाढी करताना नेहमी केसांच्या वाढीच्या दिशेनेच रेझर फिरवा. उलटे रेझर फिरवल्यास त्वचा सोलपटण्याची संभावना आहे. शेव्हिंग केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि त्यावर ऑफ्टर शेव्ह क्रिम लावा. शेव्हींगनंतर कट्स गेल्यास, रक्त आल्यास त्यावर फटकी उगाळून लावा. त्वचा तेलकट असल्यास शेव्हींग करण्यापूर्वी अल्कोहोल फ्री टोनर किंवा अस्ट्रींजेंट लावा. 


शेव्हींगनंतर


शेव्हींगनंतर आफ्टर शेव्ह किंवा माईल्ड मॉईश्चराईजर लावून चेहरा टोनअप करणे गरजेचे आहे. अल्कोहोलयुक्त आफ्टर शेव्ह वापरणे टाळा. हर्बल प्रॉडक्ट्स वापरणे फायदेशीर ठरेल. कोरफडयुक्त लोशन किंवा व्हिटॉमिन ई युक्त आफ्टर शेव्ह क्रिमचा वापर करा. त्यामुळए त्वचेची जळजळ होणार नाही.