मुंबई : टेनिस एल्बो हा एक असा आजार आहे ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागृकता नाही. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर या अजाराने त्रस्त होता. आता टेनिस एल्बो या आजाराने अभिनेता अजय देवगणही त्रस्त असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले. प्रामुख्याने खेळाडूंमध्ये आढळणार्‍या या आजाराबद्दल काही खास माहिती तुम्हीदेखील नक्की जाणून घ्या.  


टेनिस एल्बोचा त्रास म्हणजे नेमके काय ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेनिस खेळणार्‍या खेळाडूंना फार काळ हातामध्ये रॅकेट पकडावे लागते. यामुळे त्याच्या हातावर दबाव निर्माण होतो. हाताच्या बोटांच्या कार्यावरही त्याचा परिणाम होतो.हळूहळू हाताची बोटं सुजण्याचा त्रास जाणवतो. साध्या साध्या गोष्टी पकडणंदेखील अवघड होऊन बसतं. सुरूवातीच्या टप्प्यावर हा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात.  


टेनिस एल्बोचा त्रास कमी करतील हे घरगुती उपाय - 


कपभर दूधामध्ये हळद मिसळून प्यायल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. हळदीच्या दूधाचे सेवन अनेक समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 


हळदीच्या दूधात साखरेऐवजी मध मिसळून पिणेही आरोग्यवर्धक ठरते. हळदीच्या दूधात अ‍ॅन्टी ऑक्सिडंटयुक्त आणि अ‍ॅन्टी इन्फ्लामेंटरी असल्याने हळदीचे दूध टेनिस एल्बोचा त्रास सुसह्य करण्यास मदत करते.  हळदीच्या दुधाचे होतात 10 फायदे


मेथीदेखील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. मेथीच्या दाण्याची पावडर कोमट पाणी आणि दूधात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट वेदना जाणवणार्‍या जागेवर लावा. यामुळे त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.