मुंबई : बॉलीवुड अभिनेता अजय देवगण सध्या 'टोटल धमाल' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण सलगच्या शूटींगमध्ये त्याला त्रासही जाणवू लागलाय. 'स्पॉटबॉय'ने दिलेल्या वृत्तानुसार अजय देवगणला 'टेनिस एल्बो'चा त्रास सुरू झालाय. याचे निराकरण करण्यासाठी त्याला जर्मनीलाही जावे लागू शकते. अजयला जर्मनीला जाण्याचा सल्ला त्याचा सहअभिनेता अनिल कपूर याने दिलाय. काही दिवसांपूर्वी तोही या आजारातून जात होता. टेनिस एल्बोमुळे त्याला एवढा त्रास होतो की हातातून कॉफीदेखील तो उचलणे त्याला कठीण झालयं. टेनिस एल्बोला Lateral Epicondylitis असेही म्हणतात.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही त्रासातून जावे लागले होते. या आजारात हाताचे कोपर खूप दुखू लागते. हाडे आणि मांसपेशींवर अतिरिक्त दबाव पडल्यानंतर टेनिस एल्बोचा त्रास सुरू होतो. साधारण खेळाडू आणि तरुणांमध्ये शारिरीक हालाचालीदरम्यान मनगट आणि बोटांच्या हालचाली दरम्यान मांसपेशीत तणाव झाल्यास कोपराला सूज येते. या आजाराला टेनिस एल्बो म्हणतात.
'टोटल धमाल' सिनेमात अनिल कूपर आणि माधुरी दिक्षीत यांची जोडी सिल्वर स्क्रिनवर १८ वर्षांनी पुन्हा येतेय. इंदर कुमारच्या या सिनेमाची शूटींग शनिवारी सुरू झाली आहे.