Weight Loss: वजन कमी केल्याचा आनंद जास्त काळ टिकवायचा असेल तर या टिप्स फॉलो करा
आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीराचं वजन खूप महत्त्वाचं आहे. वाढलेलं वजन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे वजन वाढलं की चिंतेत वाढ होते.
How To Maintain Weight After Control: आरोग्याच्या दृष्टीकोनातून शरीराचं वजन खूप महत्त्वाचं आहे. वाढलेलं वजन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे वजन वाढलं की चिंतेत वाढ होते. यासाठी वाढलेलं वजन कमी करण्यासाठी व्यायामासह आहारावर नियंत्रण मिळवलं जातं. नियमितपणे या बाबी फॉलो केल्यानंतर वजन कमी करण्यात यश मिळतं. पण हा आनंद जास्त काळ टिकावा यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. अन्यथा वजन पुन्हा एकदा वाढू लागतं. त्यामुळे तुम्ही जर तुमचं वजन नियंत्रणात आणलं असेल तर तुम्ही या गोष्टी कायमच्या लक्षात ठेवा. यामुळे तुमचं वजन पुन्हा वाढणार नाही.
जुन्या सवयींच्या मोहात पुन्हा पडू नका: वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात ठेवा. वजन कमी झालं या आनंदात पुन्हा जुन्या सवयींकडे वळू नका. कारण जुन्या चुकींच्या सवयींमुळेच तुमचं वजन वाढलं होतं. त्याच सवयी पुन्हा एकदा करून तुमचं वजन वाढू शकतं.
आहारावर नियंत्रण ठेवा: योग्य आणि संतुलित आहार यावर व्यक्तीचं वजन ठरतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकदा आपण वजन कमी करण्यात यशस्वी ठरलो की पुन्हा आपल्याला खाण्यापिण्याच्या मोह होतो. पण हा मोहच तुम्हाला पुन्हा संकटात आणेल. कारण असंतुलित आहारामुळे तुमचं वजन पुन्हा एकदा वाढू शकतं.
नियमित व्यायाम करा: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगा करणं गरजेचं आहे. जर वजन नियंत्रणात आणलं आणि व्यायाम करणं सोडून दिलं तर पुन्हा एकदा वजन वाढू शकतं. त्यामुळे नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
उंची | पुरुषांचं वजन | महिलांचं वजन |
4.6 फूट | 28.5 – 34.9 kg | 28.5 – 34.9 kg |
4.7 फूट | 30.8 – 38.1 kg | 30.8 – 38.1 kg |
4.8 फूट | 33.5 – 40.8 kg | 32.6 – 39.9 kg |
4.9 फूट | 35.8 – 43.9 kg | 34.9 – 42.6 kg |
4.10 फूट | 38.5 – 46.7 kg | 36.4 – 44.9 kg |
4.11 फूट | 40.8 – 49.9 kg | 39 – 47.6 kg |
5.1 फूट | 40.1 – 53 kg | 40.8 – 49.9 kg |
5.2 फूट | 45.8 – 55.8 kg | 43.1 – 52.6 kg |
5.3 फूट | 48.1 – 58.9 kg | 44.9 – 54.9 kg |
5.4 फूट | 50.8 – 60.1 kg | 47.2 – 57.6 kg |
5.5 फूट | 50.0 – 64.8 kg | 49 – 59.9 kg |
5.6 फूट | 55.3 – 68 kg | 51.2 – 62.6 kg |
5.7 फूट | 58 – 70.7 kg | 53 – 64.8 kg |
5.8 फूट | 60.3 – 73.9 kg | 55.3 – 67.6 kg |
5.9 फूट | 63 – 70.6 kg | 57.1 – 69.8 kg |
5.10 फूट | 65.3 – 79.8 kg | 59.4 – 72.6 kg |
5.11 फूट | 67.6 – 83 kg | 61.2 – 74.8 kg |
6.0 फूट | 70.3 – 85.7 kg | 63.5 – 77.5 kg |
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. या उपयांचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही. )