मुंबई : गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं. अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू शकते आणि तासंनतास मऊच राहते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे पोळी फक्त खाण्याचं काम करतात, बनवत नाहीत, त्यांना वाटत असेल, असं काही असतं का, की असं केलं तर पोळी मऊ होवू शकते आणि राहू शकते, पण हो खरंच असं असतं.


गहू समोरासमोर दळून घ्या, तसंच गरम पीठ घरी आणा, गिरणीवाल्याकडे ते तासंनतास पडून राहू देऊ नका. ज्या पिशवीत किंवा डब्यात तुम्ही पीठ आणलं ते पीठ जास्त वेळ गरम राहणार नाही याकडे लक्ष द्या. 


हे हाताला गरम लागणारं पीठ टफ किंवा घमेलीत पसरून ठेवा, त्याला लवकरात लवकर थंड करा, काही जण चांगल्या प्लास्टिक पेपरवर किंवा मोठ्या प्लास्टिकच्या टफमध्ये हे पीठ फॅनखाली थंड होण्यासाठी पसरवतात, ही योग्य पद्धत आहे.


हे पीठ थंड झाल्यानंतर डब्यात भरा, जेव्हा तुम्ही पोळी करण्यासाठी कणिक मळाल तेव्हा लक्षात येईल, या पीठावर एक पांढरी साय यायची, ती आता येणार नाही, आता या पिठाची पोळी करुन पाहा, आणि तुम्हीच सांगाल ती किती वेळ मऊ आणि लुसलुशीत राहते. प्रयोग करायला हरकत काय आहे.


नेहमी लक्षात ठेवा शक्य असल्यास थेट शेतकऱ्यांकडून गहू विकत घ्या. गावाकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांकडून १५ ते २० किलो गहू खरेदी करा, त्याचा दर्जा उत्तम असतो. तसेच थेट खरेदीमुळे स्वस्तही मिळतो, घासाघीस न करता हा गहू विकत घ्या..