मुंबई : आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना अगदी दमछाक होते. ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच आपल्यावर परिणाम होत असतो. तर कोटुंबिक ताण, वाद याचा परिणाम कामावर झालेला दिसून येतो. पण हे दोन्हीही ताण एकमेकांपासून वेगवेगळे कसे ठेवावे, हे माहित असायला हवे. पण अनेकांना ते जमत नाही. मग ऑफिसमधून घरी गेल्यावरही ऑफिसमधील टेंशन्स डोक्याभोवती फेर धरू लागतात. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काय होईल याची चिंता सतावू लागते. पण या काही टिप्सने तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधील ताळमेळ योग्य प्रकारे साधू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. सर्वात आधी एक मर्यादा आखून घ्या. स्पर्धा सोपी नसली तरी ऑफिसचे काम घरी नेऊन करु नका. यामुळे तुमचा वर्क लाईफ बॅलन्स बिघडेल. तसंच ऑफिसचे काम घरी आणल्याने त्यासोबत टेन्शनही येणारच. परिणामी पर्सनल लाईफवर त्याचा परिणाम होणार. म्हणून शक्यतो ऑफिसचे काम ऑफिसमध्ये संपवा.


#2. ऑफिसमधून निघाल्यावर आपल्याला काय काय काम करायचे आहे, याचा विचार करा आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीची योजना आखा. त्यामुळे घरी जावून कामाचा ताण जाणवणार नाही. 


#3. वेळेचे नियोजन नीट करा. तुमच्या क्षमतेनुसार ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला ताण येणार नाही. अनेकदा काम वेळेत पूर्ण न झाल्याने ताण येतो. तर काम टाळण्याच्या सवयीमुळे काम अधिक वाढते. त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे.


#4. ऑफिसमध्ये असताना सोशल मीडियापासून दूर रहा. कारण यात किती वेळ जातो, याचा अंदाज लागत नाही. त्याचबरोबर त्याचा परिणाम कामावरही होतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना सोशल मीडियाचा वापर टाळा.


#5. मॅनेजर किंवा बॉसने एक्सट्रा काम दिल्यास ते करणे शक्य नसल्यास स्पष्ट नकार द्या. कारण यामुळे कदाचित तुमच्या करिअरवर चांगला परिणाम होईल पण त्यामुळे तुम्ही कामात अधिक गुंग होता. टेन्शन वाढते आणि पर्सनल लाईफवर त्याचा परिणाम होतो.